22 October 2020

News Flash

कोण म्हणतं रणबीरच्या प्रेयसीसोबत कतरिनाचा वाद आहे?

कतरिनाला वाढदिवसाच्या निमित्ताने कलाविश्वातील इतरही बऱ्याच मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण...

कतरिना कैफ, आलिया भट्ट, Alia Bhatt. Katrina Kaif

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफच्या नावांचाही समावेश होतो. सध्याच्या घडीला या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे आलियाची इन्स्टा स्टोरी.

रणबीर कपूर हा या दोन्ही अभिनेत्रींमध्ये असणारा समान दुवा. किंबहुना यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीमध्ये आणि आलिया भट्टमध्ये काही मतभेद असल्याचं स्पष्ट झालं होतं. मुळात कलाविश्वात या सर्व चर्चा पसरण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. याविषयी या दोन्ही अभिनेत्रींनी कोणतंच वक्तव्य केलं नव्हतं. पण, आलियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. कतरिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिच्यासोबतचा एक सुरेख फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि कतरिनामध्ये असणारी निखळ मैत्री दिसून येत आहे.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

Alia Bhatt, Katrina Kaif Alia Bhatt, Katrina Kaif

View this post on Instagram

Haydreaming ….🦄💃

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सहसा बी- टाऊनमध्ये अभिनेत्रींमध्ये असणाऱ्या वादांची आणि मतभेदांची बरीच चर्चा होते. त्यातही काही गोष्टींची जोड त्या चर्चांना आणखी वाव देण्यास कारणीभूत ठरते. पण, या सेलिब्रिटी बीएफएफची जोडी मात्र याला अपवाद ठरली आहे. कतरिनाला वाढदिवसाच्या निमित्ताने कलाविश्वातील इतरही बऱ्याच मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, सध्याच्या घडीला आलियाच्याच शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 11:29 am

Web Title: ranbir kapoor girlfriend alia bhatts birthday wish for bestie katrina kaif quashes rumours of feuds
Next Stories
1 ‘या’ मराठमोळ्या भावंडांनी साकारला पडद्यावरचा ‘संजू’
2 FIFA World Cup 2018 FINAL : बॉलिवूड म्हणतंय, ‘फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला तर क्रोएशियाने मनं’
3 #HappyBirthdayKatrinaKaif : कतरिनाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?
Just Now!
X