लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारा बॉलिवूडमधील ‘एलिजिबल बॅचलर’ आणि अभिनेता म्हणजेच रणबीर कपूर. पडद्यावर रोमॅण्टिक भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यातही अगदी तसांच आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
तमाशा या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सध्या रणबीर, दीपिका आणि दिग्दर्शक इम्तियाज अली रेल्वेने दिल्लीला पोहोचले आहेत. आपल्या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत असलेल्या रणबीरने तो खूप रोमॅण्टिक असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, गालिब यांच्यानंतर मीच आहे. प्रेमविषयक विचार आणि प्रेमाचा दर्जा याबाबत माझी तुलना जवळपास गालिब यांच्याशी होऊ शकते.
सध्या चित्रपटांच्या कमाईबाबत रणबीरचे नशीब त्याची साथ देत नसल्याचे दिसतंय. पण येत्या २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या तमाशा चित्रपटाने त्याला यश मिळेल, अशी अपेक्षा करुया.