News Flash

Video : रणबीरला दुखापत नक्की कशामुळे?, चाहते चिंतेत

आलिया त्याची काळजी घेताना दिसत आहे

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूरची जोरदार चर्चा सुरु आहे. रणबीर लवकरच अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर जोरदार तयारी करत असून त्याच्या हाताला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. नुकतंच रणबीर आणि आलियाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्याचा हाताला दुखापत झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. रणबीरला ही दुखापत नक्की कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आलिया त्याची प्रचंड काळजी घेत असल्याचं पाहायला मिळाली.

काही दिवसांपूर्वी रणबीरला विकेंडच्या दिवशी फुटबॉल खेळताना पाहण्यात आलं होतं. त्याचे यावेळचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे रणबीर फुटबॉल खेळत असताना तो व्यवस्थित होता. त्याला दुखापतदेखील झाली नव्हती. मात्र मुंबई विमानतळावर त्याला पाहिल्यानंतर त्याचा हात स्लिंगमध्ये दिसला. अर्थात यावरुन त्याच्या हाताला दुखापत झाल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. मात्र त्याला ही दुखापत फुटबॉल खेळतांना झाली की अन्य कोणत्या कारणामुळे हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील चिंतेत आहे.


दरम्यान, रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार असून आलिया भट त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. राजकुमार हिरानी यांच्या ‘संजू’ या चित्रपटामध्ये रणबीर मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 11:08 am

Web Title: ranbir kapoor injures arm fans palpitate with concern what happened to my honey ssj 93
Next Stories
1 फत्तेशिकस्त : बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते
2 रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकानं केला खुलासा
3 सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा
Just Now!
X