05 July 2020

News Flash

रणबीर आणि कतरिनाचे ‘हम बने तुम बने एक दूजे के लिए’

बॉलिवूडची हॉट जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मे महिन्यामध्येच साखरपुडा करणार असल्याचे समजते.

| May 5, 2015 02:08 am

बॉलिवूडची हॉट जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मे महिन्यामध्येच साखरपुडा करणार असल्याचे समजते. लवकरच याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. अलीकडेच कतरिना रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांसमवेत एका डिनर डेटचा आनंद घेताना आढळून आली होती. यानंतर त्या दोघांमधील लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण यायला लागले. हॉलिडे ट्रिप असो अथवा मित्रांच्या घरी पार्टी रणबीर आणि कतरिना नेहमी एकमेकांबरोबर दिसतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस रणबीर आणि कतरिनाच्या घरचे एका खास सोहळ्याचे आयोजन करत असल्याचे समजते, ज्यात दोघांच्या रिलेशनशिपला अधिकृत स्वीकृती देण्यात येईल. कुटुंबातील काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडणार असल्याचे समजते. हा खास सोहळा म्हणजे या दोघांचा साखरपुडा तर नव्हे ना, अशी शंका अनेकांकडून व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2015 2:08 am

Web Title: ranbir kapoor katrina kaif engagement or roka to take place this month
Next Stories
1 ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’नंतर ‘तू ही रे’
2 ‘बॉम्बे व्हेल्व्हेट’च्या सेटवर रणबीर कपूर मद्यप्राशन करून यायचा!
3 ‘उडता पंजाब’मध्ये आलिया भट्ट साकारणार स्थलांतरित बिहारी मजुराची भूमिका
Just Now!
X