News Flash

आलिया नाही, तर ‘हे’ आहेत रणबीरचे लकी चार्म

सोनमच्या प्रश्नावर रणबीरने दिलं खरं उत्तर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्या आहेत. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात येत. इतकंच नाही तर हे दोघंही एकमेकांविषयी अगदी भरभरुन बोलतात. कोणताही पुरस्कार सोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम हे दोघंही त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. त्यामुळे रणबीरसाठी आलिया त्याचा लकी चार्म असेल असं साऱ्यांनाच वाटतं. मात्र रणबीरने त्याचा लकी चार्म आलिया नसल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री सोनम कपूरने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देत रणबीरने त्याच्या या लकी चार्मचा खुलासा केला आहे.

सोनम लवकरच ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटातून झोया सिंग सोलंकी या राजपूत मुलीची कथा उलगडण्यात येणार आहे. झोया सोलंकी ही मुलगी भारतीय क्रिकेट टीमला भेटते आणि १९८३ च्या वर्ल्ड कपसाठी लकी चार्म ठरते. या मुलीवर आधारित चित्रपटात सोनम मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सोनमने या चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तुमचा लकी चार्म कोण आहे? असं प्रश्न विचारला. त्यावर रणबीरने एक व्हिडीओ शेअर करत त्याचा लकी चार्म कोण आहे ते सांगितलं.

“८ हा माझा लकी क्रमांक आहे. याच दिवशी म्हणजे ८ तारखेलाच माझ्या आईचा नीतू कपूर यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे हा माझा लकी क्रमांक आहे. त्यासोबतच रेड मेल ट्रक हा माझा दुसरा लकी चार्म आहे. कारण असं अनेक वेळा झालं आहे, जेव्हा मी या दोन गोष्टी पाहतो. त्यावेळी माझी इच्छा पूर्ण होते”, असं रणबीरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.


रणबीरचा हा व्हिडीओ सोनमने शेअर करत, “माझ्या मित्राने रणबीरने एक छानसा व्हिडीओ शेअर करत त्याचा लकी चार्म कोण आहे ते सांगितलं आहे. धन्यवाद संजू! तुम्हीदेखील तुमचा लकी चार्म कोणता ते सांगा”, असं सोनमने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, ‘द जोया फॅक्टर’हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनम आणि दुलकर सलमान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार असून ते दोघं पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 6:27 pm

Web Title: ranbir kapoor lucky charms sonam kapoor dulquer salmaan the zoya factor ssj 93
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये रिंकू भाभी परत येणार? सुनीलचं सूचक ट्विट
2 देश महिलांसाठी सुरक्षित नाही हे न सांगण्यात कसली देशभक्ती?- रिचा चड्ढा
3 Photo : गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या; पाहा लूक