बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. सध्या रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. त्यामुळे ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकले जातील असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे मात्र,रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरने थेट एका महिला पत्रकारालाच तुझं लग्न झालंय का असा प्रश्न विचारला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना असून एका कार्यक्रमातला असल्याचं दिसून येत आहे. यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांपैकी एका महिला पत्रकाराने रणबीरचं कौतूक करत लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावर रणबीरने हटके उत्तर दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)


“तू या कपड्यांमध्ये एकदम परफेक्ट नवरदेव असल्यासारखाच दिसतो. पण मग, लग्न कधी करणार?”, असा प्रश्न या महिला पत्रकाराने विचारला. त्यावर “तुझं लग्न झालंय का नसेल झालं तर मी करेन तुझ्याशी लग्न”, असं विनोदी पद्धतीने रणबीरने या प्रश्नाचं उत्तर दिलं. हा व्हिडिओ झूम टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वाचा : Video : ‘नो फोटो प्लीज….’; फोटोग्राफर्सला पाहताच वैतागला तैमूर

दरम्यान, रणबीर कपूर सध्या आलिया डेट करत आहे. मात्र, यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. यात दीपिका पदुकोणसोबत असलेलं त्याचं रिलेशन चांगलंच चर्चेत आलं होतं.