बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला आहे. स्टार किड्सला लाँच करणाऱ्या करण जोहरवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. अनेकांनी कॉफी विथ करण या करणच्या शोमधील काही व्हिडीओ शेअर करत त्याला चांगलेच सुनावले आहे. आता अभिनेता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने शोबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये रणबीरला ‘कॉफी विथ करण’ या शो विषयी प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर रणबीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला आता कंटाळा आला आहे. मी या सीझनमध्ये सहभागी होऊ शकत नाही असे पण सांगितले होते. मला जबदस्ती बोलवण्यात आले होते. मी आणि अनुष्का या विरोधात बोलणार होतो आणि संपूर्ण इंडस्ट्रीला सोबत घेणार होतो. हे चुकीचे आहे. करण जोहर या शोमधून पैसे कमावतो’ असे रणबीरने म्हटले आहे.

एका यूजरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत करण जोहरच्या कॉफी विथ करण शोचे सत्य. तो अनेकांजा शोमध्ये येण्यासाठी जबरदस्ती करतो असे म्हटले आहे.