News Flash

‘शमशेरा’मध्ये रणबीरसोबत संजय दत्तही दिसणार?

संजय दत्त आणि रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र येणार आहे. या चित्रपटात संजय दत्तदेखील रणबीरप्रमाणे डाकूची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट ३१ जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारलेल्या ‘संजू’चित्रपटात रणबीरनं महत्त्वाची भूमिका साकारली. मात्र या चित्रपटातील गाणं वगळता रणबीर आणि संजू ही जोडी रुपेरी पडद्यावर दिसली नाही. पण आता मात्र संजय दत्त आणि रणबीर कपूर ‘शमशेरा’ चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र येणार आहे. या चित्रपटात संजय दत्तदेखील रणबीरप्रमाणे डाकूची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये आहेत. हा चित्रपट ३१ जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

‘करम से डकैत, धरम से आजाद’ अशा टॅगलाइनसह या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाचा दिग्दर्शक करण मल्होत्रा ‘शमशेरा’चं दिग्दर्शन करणार आहे. ‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं रणबीर चौकटीबाहेरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘ज्या भूमिकेची मी इतक्या दिवसांपासून प्रतिक्षा करत होतो, अखेर ती मला शमशेराच्या माध्यमातून मिळाली आहे. मला साचेबद्ध भूमिकांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण करत आहे आणि हे नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार आहे.’ अशी प्रतिक्रिया रणबीरनं दिली आहे. या वर्षाअखेरीस ‘शमशेरा’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटानिमित्तानं रणबीर संजय दत्त ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:56 pm

Web Title: ranbir kapoor sanjay dutt shamshera will release on 2020
Next Stories
1 सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू
2 ..म्हणून ‘संजू’चं यश साजरा करण्यासाठी संजय दत्त आलाच नाही
3 बॉडीगार्ड शेराच्या मुलाचंही बॉलिवूडमध्ये करिअर घडवणार सलमान
Just Now!
X