इंडियन आयडल या रिअॅलिटी शोच्या येत्या भागात अभिनेत्री नीतू कपूर या खास गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या भागात केला जाणार आहे. ऋषी कपूर यांच्या सिनेमातील सदाबहार गाण्यांची पर्वणी या भागात अनुभवता येईल.
या खास भागासाठी इंडियन आयडलच्या मंचावर नीतू कपूर यांनी हजेरी लावली तर अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची बहिण रिद्धीमा हिने व्हिडीओच्या माध्यमातून काही अनुभव शेअर केले. या एपिसोडच्या प्रोमोमध्ये रणबीरने त्याच्या लहानपणीचा एक अनुभव शेअर केल्याचं दिसतंय.
रणबीरने त्याचा बालपणीचा अनुभव या शोमध्ये सांगितला आहे. “जेव्हा आम्ही लहान होतो. तेव्हा आईने मला आणि रिद्धीमाला शास्त्रिय संगीताची शिकवणी लावली होती. मला आठवतंय क्लास संपल्यानंतर गुरुजी म्हणाले होते कि, मी तुमच्या मुलीला तर शिकवू शकतो. मात्र तुमच्या मुलाकडे सूर ताल तर नाहीच आणि त्याला त्याची जाणही नाही .तेव्हा कृपा करा त्याला कराटे क्लास लावा. कारण त्याच्याने हे काही शक्य नाही.” ही मजेशीर आठवण रणबीरने शेअर केली.
View this post on Instagram
तर रिद्धीमाने आईचं कौतुक केलं आहे. “तू आमचा आणि आपल्य़ा संपूर्ण कुटुंबाचा आधार आहेस. तू खूप स्ट्रॉन्ग आहेस. तू आपल्या कुटुंबाची आयर्नलेडी आहेस,” असं रिद्धीमाने आणि नीतू कपूर यांच्यासाठी म्हंटल आहे.
यावेळी रणबीरचा चेहरा पाहताच नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याचं पाहायला मिळतंय. “मेरा बच्चा” असं त्या म्हणाल्या.
30 एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2021 3:25 pm