08 March 2021

News Flash

रणबीर कपूरच्या बहीणीने चोरीच्या आरोपानंतर मागितली जाहीर माफी

इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित झाल्या चुकीबद्दल माफी मागितली

अभिनेता रणबीर कपूर याची बहिण आणि प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर असलेल्या रिधिमा साहनी हीच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडच्या डिझाईन्सची चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच याविषयीची चर्चा झाल्यानंतर रिधिमाने संबंधितांची माफीही मागितली. डाएटसब्या नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन रिधिमाने आपल्या डिझाईन्सची नक्कल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा दाखला देण्यासाठी या अकाऊंटवर मूळ दागिने आणि रिधिमाने कॉपी केलेल्या डिझाईनचे दागिने यांचा फोटोही देण्यात आला. रिधिमावर अशाप्रकारे चोरीचा आरोप झाल्यानंतर तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित झाल्या चुकीबद्दल माफी मागितली.

या पोस्टमध्ये रिधिमा म्हणते, ‘आमच्या रिद्धीमा कपूर साहनी ज्वेलरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चोरीला, नकलांना प्राधान्य दिलं जात नाही. Mikimoto Kokichi या ब्रँडच्या कानातल्यांचे फोटो पोस्ट करताना त्या कलेच्या कल्पकतेला आणि कलाकाराला श्रेय न दिल्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही प्रत्येक डिझायनरच्या कलात्मकतेचा आदर करतो. त्यासोबतच कधीच आम्ही कोणाच्या डिझाईनची नक्कल करत नाही’, याबरोबरच या पोस्टनंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा कानातल्यांचा फोटो डिलीट केला आहे. Mikimoto Kokichi ही १९१६ पासून बाजारात असणारी एक आंतरराष्ट्रीय ज्वेलरीच्या ब्रँडची कंपनी आहे. मात्र अशाप्रकारे रिधिमावर आरोप झाल्याने तिची बाजारातील प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 6:59 pm

Web Title: ranbir kapoor sister riddhima accused of copying jewellery designs from famous brand mikimoto kokichi
Next Stories
1 ‘ 2.0’ हा भारतीय सिनेसृष्टीचा अभिमान- रजनीकांत
2 पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित
3 तुमचे आशीर्वाद राहू द्या, पाहा कपिलची लग्नपत्रिका
Just Now!
X