News Flash

Video : वडिलांच्या तब्येतीविषयी रणबीरने व्यक्त केली काळजी; आलिया झाली भावूक

अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत.

अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची सोशल मीडियावर माहिती देत असतात. मात्र त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे हे स्पष्टपणे कोणी सांगितलं नाही. ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरला नुकताच ‘झी सिने अॅवॉड्स’कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना रणबीरने आईवडिलांचे आभार मानले. यावेळी त्याने ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयीसुद्धा वक्तव्य केलं. हे ऐकताना मंचावर उपस्थित असलेली आलिया भट्ट भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘संजू’ या चित्रपटासाठी रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार आलियाच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या दोन व्यक्तींना मी हा पुरस्कार समर्पित करतो, ते म्हणजे बाबा ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर. माझ्या बाबांच्या आयुष्यातला कठीण काळ सुरू आहे. जेव्हा आयुष्यात तुम्ही अशाप्रकारच्या कसोटींना सामोरं जाता, तेव्हा तुमच्यातला खरा व्यक्ती जागा होतो असं मला वाटतं. मी जेव्हा कधी त्यांना भेटतो तेव्हा ते चित्रपटांविषयी फार गप्पा मारतात. त्यांच्या पुनरागमनाविषयी चिंतासुद्धा व्यक्त करतात. मला चित्रपटांमध्ये भूमिका मिळेल का, मला ऑफर्स मिळतील का, मी पुन्हा अभिनय करू शकेन का असे प्रश्न त्यांना सतावत असतात.’

रणबीर त्याच्या भावना व्यक्त करत असताना आलियासुद्धा भावूक झाली. रणबीरने पुरस्कार स्वीकारल्यानंतर नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. तर ऋषी कपूर यांनी न्युयॉर्कमध्ये उपचार घेताना त्यांची प्रतिक्रिया दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 1:14 pm

Web Title: ranbir kapoor speech after receiving best actor award leaves alia bhatt emotional
Next Stories
1 अॅमी जॅक्सन गर्भवती; अब्जाधीश प्रियकराशी जानेवारीत केला होता साखरपुडा
2 दिल्ली क्राइम – निर्भया प्रकरण पोलिसांच्या नजरेतून
3 वाढत्या वजनामुळे नर्गिसला करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना
Just Now!
X