News Flash

“तुम्हाला लॉकडाउन नाही का?”, रणबीर कपूरचा प्रश्न

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेता रणबीर कपूर नुकताच करोनातून बरा झाला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर रणबीर होम क्वारंटाइन होता. करोनाची लागण झाल्याने रणबीर कपूर चांगलाच चर्चेत आला होता. करोनातून बरा झाल्यानंतर रणबीरला नुकतच एका दवाखान्याबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. रणबीर आई नीतू कपूर यांच्यासोबत दवाखान्यात गेला होता. यावेळी फोटोग्राफर्सना पाहून रणबीरने त्यांना “तुम्हाला लॉकडाउन नाही का? ” असं प्रश्न विचारला.

मुंबईतील खारमध्ये रणबीरला दवाखान्यात जाताना स्पॉट करण्यात आलं. यावेळी रणबीर आणि नितू कपूर दोघंही वेगवेगळ्या गाड्यांमधून आले होते. रणबीरला गाडीतून उतरताच फोटोग्राफर्सनी वेढलं. त्यानंतर रणबीरने फोटोग्राफर्सना विचारलं “तुम्हा लोकांना लॉकडाउन नाही आहे का? यावर फोटोग्राफर्स म्हणाले आहेत “काम सुरु आहे सर” यानंतर रणबीर दवाखान्याच्या दिशेने चालू लागला. यावेळी त्याने फोटोग्राफर्सना अंतर राखण्यास सांगितलं.  रणबीरचा हा व्हिडीओ सिलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी रणबीरने पूर्ण काळजी घेत मास्क घातलं होतं. फोटो काढण्यासाठी देखईल त्याने मास्क काढलं नाही. नुकताच करोनातून बरा झाल्याने रणबीर संपूर्ण काळजी घेत असल्याचं दिसून आलं.

आणखी वाचा- “तारक मेहता….”च्या ४ कलाकारांना करोनाची लागण, चित्रीकरण थांबवण्यावर निर्माते म्हणाले,”…….”

रणबीर लवकरच आलिया भट्टसोब ब्रह्मास्त्र सिनेमात झळकणार आहे. याशिवाय तो शमशेरा, अॅनिमल या सिनेमातूनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 4:11 pm

Web Title: ranbir kapoor spotted near clinic asked paparazzi you dont have lockdown kpw 89
Next Stories
1 “बिकिनीमुळे लोक आकर्षित होतात, सन्मान देत नाहीत आणि मला तो हवा होता….”- बिकिनी शूटवर शर्मिला यांचं मत
2 ‘या’ कारणामुळे अमेरिकन सीरिजला अनुमप खेर यांचा रामराम
3 अभिनेता करण वाहीला जीवे मारण्य़ाची धमकी; कुभंमेळ्यातील नागा साधूंवर पोस्ट करणं महागात
Just Now!
X