02 March 2021

News Flash

Sanju : प्रदर्शनापूर्वीच ‘संजू’ चित्रपट झाला लीक

Sanju : प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्यानं याचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Sanju Movie : बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट हा प्रदर्शनापूर्वीच लीक झाला आहे.

Sanju : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘संजू’ चित्रपट हा प्रदर्शनापूर्वीच लीक झाला आहे. याचा मोठा फटका चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. देशभरातील चित्रपटगृहात शुक्रवारी २९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोही संपला नाही मात्र त्याआधीच सोशल मीडियावर हा चित्रपट लीक झाला आहे.

या चित्रपटाची टोरेंट डाऊनलोड लिंक काही युजर्सनं शेअर केली आहे. तर या चित्रपटाची एचडी प्रिंटदेखील उपलब्ध असल्याचा दावा काही युजर्सनं केला आहे. यामुळे सोशल मीडियावर रणबीरच्या चाहत्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. युजर्सनं लिंक शेअर करून पायरसीचा प्रसार करू नये असं आवाहन चाहत्यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभेल आणि पहिल्याच दिवशी हा चित्रपट ३० कोटींहून अधिकचा गल्ला जमवेल असा विश्वास अनेक चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्यानं याचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Sanju Movie Review Live Updates: व्यक्ती एक, रुपं अनेक…’संजू’

याआधी ‘रेस ३’ देखील ऑनलाइन लीक झाला होता. ‘रेस ३’ बरोबरच रजनीकांत यांचा ‘काला’ आणि दीपिका रणबीरचा ‘पद्मावत’ सिनेमादेखील ऑनलाइन लीक झाला होता. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाला देखील पायरसीचा फटका बसला होता. सेन्सॉरच्या कात्रीत आणि वादात सापडलेला हा चित्रपटदेखील युट्युबवर प्रदर्शनापूर्वीच लीक झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 11:26 am

Web Title: ranbir kapoor starrer sanju has been leaked online
Next Stories
1 संजयला भेट देण्यासाठी दिया मिर्झानं दीड लाखांत खरेदी केलं ‘मदर इंडिया’चं पोस्टर
2 TOP 5 : रणबीरच्या ‘या’ पाच चित्रपटांनी चाखली कोट्यवधींच्या कमाईची ‘बर्फी’
3 Dhadak : इशानही म्हणतो ‘आर्ची- परश्या’च सरस
Just Now!
X