25 February 2021

News Flash

Video: रणबीरने प्रियांकाला शाहिदच्या नावाने चिडवले अन्…

हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान रणबीरने प्रियांकाला शाहिदच्या नावावे चिडवले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणबीर आणि प्रियांकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर प्रियांका चोप्राला चिडवताना दिसत आहे. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू येतं. थोड्या वेळाने प्रियांका देखील रणबीरला चिडवताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Big Bollywood (@bigbollywoodpage)

Video: व्हिसा न घेताच अभिनेता पोहोचला दुबई अन्…

एका कार्यक्रमाला रणबीर आणि प्रियांकाने हजेरी लावली होती. त्यावेळी दोघे एकमेकांना चिडवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर ‘हाय.. मी शाहिद कपूर…’ असे बोलताना दिसत आहे. त्यावेळी प्रियांका शाहिद कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे रणबीरने तिला शाहिदच्या नावाने चिडवले होते. रणबीर आणि प्रियांकाने ‘बर्फी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे व्हायरल होणारा हा व्हिडीओ हा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 1:29 pm

Web Title: ranbir kapoor teased priyanka chopra video viral avb 95
Next Stories
1 ‘…म्हणून ‘त्या’ भूमिकांकडे आकर्षित होतो’; सैफचा खुलासा
2 ‘आजही अंगावर काटा येतो’; सुशांतच्या ‘त्या’ आठवणीत अंकिता भावूक
3 लवकरच येणार ‘मास्टर’ चित्रपटाचा हिंदी रिमेक
Just Now!
X