News Flash

कन्फर्म! रणबीर कपूरला करोनाची लागण

आई नीतू कपूर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती

काही वेळापूर्वीच अभिनेता रणबीर कपूरची तब्येत खराब असल्याचं त्याचे काका रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचं कन्फर्म नव्हतं. आता मात्र यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. रणबीरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो सध्या घरीच विलगीकरणात आहे आणि त्याची तब्येत व्यवस्थित असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

यासोबतच त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनाही करोना संसर्ग झाला होता. आता त्या बऱ्या झाल्या आहेत.

रणबीर सध्या अभिनेत्री आलिया भटसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या बद्दलचे फोटोजही पोस्ट केले होते.

रणबीरने आपल्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले आहे. एक म्हणजे ‘ब्रम्हास्त्र’ यात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चनही दिसणार आहेत आणि दुसरा म्हणजे ‘शमशेरा’. सध्या रणबीर ‘ऍनिमल’ आणि लव रंजनच्या एका चित्रपटात दिसणार आहे ज्याचं नाव अजून निश्चित झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 2:18 pm

Web Title: ranbir kapoor tested positive for corona vsk 98
Next Stories
1 करायला गेली एक झालं भलतचं!, जेनेलियाच्या हाताला दुखापत
2 ‘फॅमिली मॅन २’बद्दल निर्मात्यांची मोठी घोषणा
3 ‘गंगुबाई काठियावाडी’च्या अडचणीत वाढ, कॉंग्रेस आमदाराने चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची केली मागणी
Just Now!
X