News Flash

लवकरच रणबीरचे ब्रेकअप प्रेक्षकांसमोर होणार उघड

करण जोहरही तुमच्यासाठी ब्रेकअपचं गाणं घेऊन येतोय

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार

आपल्या प्रत्येकांचीच ठराविक अशी काही आवडीची गाणी असतात. अशी गाणी जी आपण अनेकदा ऐकतो आणि परत परत ऐकतो. ब्रेकअप झालं असेल तर ती व्यक्ती त्यासंदर्भातली गाणी ऐकतो. करण जोहरही तुमच्यासाठी ब्रेकअपचं गाणं घेऊन येतोय. पण हे गाणं इतर ब्रेकअपच्या गाण्यांपेक्षा वेगळं आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या त्याच्या आगामी सिनेमात ब्रेकअपचे गाणे हे दुःख व्यक्त करणारे नसून पार्टी करताना चित्रित केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रेमभंग झाल्यावर रडलेच पाहिजे असे नाही तर कधी कधी पार्टीही केली पाहिजे असा मेसेज कदाचित करणला या गाण्यातून द्यायचा आहे. ‘ब्रेकअप साँग, दर्दे दिल की फिलिंग साँग’ असे या गाण्याचे बोल आहेत.

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर हे एका पबमध्ये या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत बनणाऱ्या या सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर फवाद खान पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. करणने या गाण्याचे टिझर त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. ब्रेकअप गाण्याच्या आधी ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बुल्लेया’ आणि ‘चन्ना मेरेया’ ही तीन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.

पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर तो मायदेशी परतला. या सिनेमात त्याची भूमिका असल्यामुळे मनसेने हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकीच दिली आहे. येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा त्याच दिवशी प्रदर्शित होणार की नाही हे तर आता येणारा काळच सांगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 6:03 pm

Web Title: ranbir kapoor to celebrate breakup with anushka sharma for his new song of ae dil hai mushkil
Next Stories
1 या अभिनेत्रीने मिळवून दिले हरवलेल्या चिमुरडीला तिचे आई-बाबा
2 चिमुरड्या मिशासह पहिल्यांदाच शाहिद आणि मीरा गेले सुट्टीवर
3 १९७५ च्या आणीबाणीवर येणार सिनेमा
Just Now!
X