News Flash

काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

लव रणबीरच्या हट्टापायी नुसरतला डच्चू देणार का हे पाहण्यासारखं ठरेल. रणबीरसोबत या चित्रपटात अजय देवगनचीही प्रमुख भूमिका आहे.

रणबीर कपूर

गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या रणबीरचं ‘संजू’ चित्रपटानं पूर्णपणे नशीबच बदललं. ‘संजू’नं बॉक्स ऑफिसवर तब्बल साडेतीनशे कोटींहून अधिकची कमाई केली. ‘संजू’मध्ये रणबीरनं साकारलेल्या अप्रतिम भूमिकेमुळे आणि चित्रपटांच्या यशामुळे रणबीर आता आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत जाऊन पुन्हा एकदा विराजमान झाला आहे. ‘प्यार का पंचनामा’ फेम लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीर झळकणार आहे. मात्र या चित्रपटात बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्रीच घ्यावी अशी मागणी रणबीरनं केली आहे.

रणबीरसाठी सहकलाकार म्हणून आघाडीच्या अभिनेत्रीच्या शोधात सध्या लव रंजन आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका, करिना, कतरिना, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. मात्र दीपिका, सोनम, कतरिनासोबत रणबीरचे वाद जुने आहेत. प्रियांका तिच्या चित्रपटांत व्यग्र आहे. त्यामुळे लवच्या आगामी चित्रपटात आलीया दिसणार का ? याचं कुतूहल अनेकांना आहे.

लवच्या अनेक चित्रपटात नुसरत भरूचा हिच महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. लव आणि नुसरत एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत त्यामुळे लव रणबीरच्या हट्टापायी नुसरतला डच्चू देणार का हे पाहण्यासारखं ठरेल. रणबीरसोबत या चित्रपटात अजय देवगनचीही प्रमुख भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 6:08 pm

Web Title: ranbir kapoor wants a famous heroine for his next luv ranjan film
Next Stories
1 ..म्हणून राकेश बापटने धरली अध्यात्माची कास
2 Kerala Floods : पूरग्रस्तांसाठी अभिनेत्यानं उघडले आपल्या घराचे दार
3 इन्स्टाग्रामवर दीपिका, प्रियांकाला मागे टाकत श्रद्धा ठरली नंबर वन
Just Now!
X