News Flash

‘रणबीर, करिश्मा आणि करीना घराणेशाहीमुळे नाही तर…’, रिद्धिमा कपूरचा खुलासा

रिद्धिमाने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर ही एक ज्वेलरी डिझायनर आहे. रिद्धिमा चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. रिद्धिमाने नुकत्याच एका मुलाखतीत घरानेशाहीवर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिद्धिमाने नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रिद्धिमाने घरानेशाहीवर वक्तव्य केलं आहे. “सुविधा म्हणजे काय? आम्ही एका नावासोबत मोठे होतो आणि त्याची सवय झाली आहे. त्याचबरोबर आपण कौटुंबिक नावामुळे जरी लोकांच्या नजरेत येत असलो तरी, जेव्हा आपण एखादं ब्रॅंड सुरु करतो, तेव्हा ते ब्रॅंड स्वत: बोलतं,” असं रिद्धिमा म्हणाली.

रिद्धिमा पुढे म्हणाली, “जर मी अभिनेत्री झाली असती, तर लोक म्हटले असते की हे तर होणारचं होतं कारण माझं कुटुंब हे चित्रपटसृष्टीत आहेत. रणबीर, करिश्मा, करीना स्टारकिड्स आहेत मात्र त्यांच काम बोलतं. त्यांना यश हे त्यांच्या कामामुळे आणि कौशल्यामुळे मिळालं आहे. ते सुपरस्टार्स आहेत कारण ते जे करत आहेत, ते काम ते अप्रतिम करतं आहेत. स्टारकिड्सला सुद्धा त्यांच्या आयुष्यात काही तरी करायचं असतं. आपण काय करतो याकडे दुर्लक्ष करत लोक आपल्याला बोलणार आहेत, तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपलं काम केलं पाहिजे कारण आपलं काम बोलतं.”

घराणेशाहीवर सर्वाधीक चर्चा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या निधनानंतर सुरु झाली. सुशांत उत्तम अभिनेता असूनही घराणेशाहीमुळे त्याला काम मिळतं नसल्याच्या चर्चा होत्या.

आणखी वाचा : ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

रिद्धिमाने व्यावसायीक भरत सहानीशी लग्न केलं आहे. ते दोघे मुंबईत राहतात. त्यांना एक मुलगी असून समारा असे तिचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 10:11 am

Web Title: ranbir karishma kareena are successful because of their talent rishi kapoors daughter riddhima on nepotism dcp 98
Next Stories
1 हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘लग्न’ जास्त महत्वाचं ना की ‘समारंभ’, सोनाली कुलकर्णीच्या निर्णयाचं कौतुक
3 विमानतळावर रकुलच्या बॅगमध्ये पोलिसांना सापडली धोकादायक वस्तू; सांगितला किस्सा
Just Now!
X