News Flash

आयटम साँगवर रणबीर-माधुरीचे ठुमके

बॉलिवूडमध्ये आयटम साँग हा चित्रपटाचा अविभाज्य भाग बनला आहे. बॉलिवूडचा ‘लव्हरबॉय’ रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटासाठी तर

| April 26, 2013 04:09 am

बॉलिवूडमध्ये आयटम साँग हा चित्रपटाचा अविभाज्य भाग बनला आहे. बॉलिवूडचा ‘लव्हरबॉय’ रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटासाठी तर आता आयटम साँगसाठी थेट माधुरी दीक्षितलाच पाचारण करण्यात आले आहे. माधुरी दीक्षित-रणबीर यांच्या नृत्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले.
या चित्रपटातील ‘बदतमीज दिल’ हे गाणे रणबीरच्या नृत्य अदाकारीमुळे अगोदरच लोकप्रिय ठरले असून आता नृत्यांगना नंबर वन अर्थात माधुरीसोबत नृत्य करण्याची संधी रणबीरला मिळालीय. आयटम साँगच्या चित्रीकरणाची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण माधुरीच्या नृत्यशैलीचा आणि अदाकारीचा मी सुरुवातीपासून चाहता आहे. तिच्यासोबत नृत्य करायला मिळण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली, अशी प्रतिक्रिया रणबीर कपूरने व्यक्त केली.
अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटामुळे आणखी एक योग जुळून आला. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फराह खानने केले आहे. माधुरी आपली सर्वात आवडती नृत्य कलावंत आहे, असे फराह खानने अनेकदा सांगितले आहे. तब्बल ११ अकरा वर्षांनंतर या दोघी पुन्हा एकत्र आल्या आहेत. माधुरी-फराह खान यापूर्वी ‘हम तुम्हारे है सनम’मध्ये एकत्र काम करीत होत्या.
आणखी एक योगायोग म्हणजे सलमान, शाहरूख, आमिर या तीन सुपरस्टार खानसोबत माधुरी दीक्षितने अनेक चित्रपटांसाठी काम केले असून आता आजच्या पिढीचा सुपरस्टार मानला जाणारा रणबीर कपूर याच्यासोबत माधुरी एका गाण्यासाठी का होईना रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
माधुरी दीक्षितचा गुलाबी गँग हा चित्रपट लवकरच झळकणार आहे. अमेरिकेतून कायमची परतल्यानंतर आतापर्यंत तिचा एकही चित्रपट तिच्या चाहत्यांना पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे मेमध्ये प्रदर्शित होत असलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाद्वारे एका गाण्यापुरते का होईना पण माधुरी दीक्षितच्या असंख्य चाहत्यांना तिला पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकताना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:09 am

Web Title: ranbir madhuri dance on item song
Next Stories
1 नाना पाटेकर घेणार प्रकाश आमटे यांची मुलाखत
2 संजय दत्तच्या चित्रपटांवर बहिष्कार?
3 रजनीकांतचा ‘कोचादैयान’मध्ये डबल रोल
Just Now!
X