News Flash

रणबीरची नेटफ्लिक्सवर दमदार एन्ट्री… व्हिडिओ पाहून चाहते उत्सुक

नेटफ्लिक्सने आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन रणबीरचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश सध्या अस्वस्थ आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन तसंच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तर अनेकांचं चित्रीकरण थांबलेलं आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने आता मनोरंजनासाठी ओटीटीचा आधार प्रेक्षकांना घ्यावा लागत आहे. त्यामुळे अनेक कलाकार डिजीटल माध्यमांकडे वळत आहेत.

यात अभिनेता रणबीर कपूरचाही समावेश आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अकाऊंटवरुन त्याचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर लवकरच भेटू असंही म्हणत आहे. आता यामुळे त्याचे चाहते त्याला डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यास चांगलेच उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

या व्हिडिओमध्ये रणबीर नेटफ्लिक्सबद्दल माहिती देत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “नेटफ्लिक्सवर आहे अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, कार्टून…म्हणजे पूर्ण परिवारासाठी संपूर्ण मनोरंजन. आत्ता तुम्ही सगळे व्यस्त आहात…भेटूया क्रिकेटनंतर!”

त्याच्या या व्हिडिओनंतर तो लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार असं वाटत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत. त्याच्यावर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एक युजर म्हणतो, “हे खरं व्हायला हवं”. तर अजून एक युजर म्हणतो, “रणबीर, प्लीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण कर” तर अनेक युजर्सनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

रणबीर ‘संजू’ या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसला होता. रणबीरच्या या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्याचं कौतुकही झालं. आता तो ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अलिया भट दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 12:25 pm

Web Title: ranbir to be featured in next netflix project vsk 98
Next Stories
1 सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”
2 ‘येणार तर मोदीच’, अनुपम खेर यांचे ट्वीट चर्चेत
3 Oscar 2021 : म्हणून ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावं ठेवतात गोपनीय
Just Now!
X