11 December 2017

News Flash

मुलीमुळे रणदीप सुश्मिताच्या प्रेमात, ब्रेकअपनंतर बदलले आयुष्य

जवळपास तीन वर्षांनंतर सुश्मिता आणि रणदीपचे ब्रेकअप झाले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 21, 2017 12:24 PM

सुश्मिता सेन आणि रणदीप हुड्डा

सिनेसृष्टीत आपल्या नावासाठी स्ट्रगल करत असताना रणदीप हुड्डा याची ओळख ‘कर्मा और होली’ या सिनेमाच्या सेटवर झाली. दोघांची ओळख कालांतराने मैत्री आणि मग त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांना एकमेकांची साथ एवढी आवडायची की ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तब्बल तीन वर्षे हो दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

शिधापत्रिकेतून नागराज मंजुळेंचे नाव होणार रद्द

तो रणदीपचा उमेदीचा काळ असल्यामुळे त्याला त्याच्या सिनेमांपेक्षा सुश्मिताचा प्रियकर याच नावाने अधिक ओळखले जायचे. पार्टी किंवा सिनेमांच्या प्रिमिअरमध्ये हे दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. सुश्मितालाही आपला नवीन प्रियकर प्रसारमाध्यमांना दाखण्यात आनंद मिळायचा. या सगळ्यात रणदीप सर्वात जास्त जवळ कोणाच्या असेल तर ती सुश्मिताची मोठी मुलगी रिनी. रिनीसोबत तो भावनिकरित्या जोडला गेला होता. त्याने एका मुलाखतीतदेखील सांगितले होते की, तो सुश्मितासोबतच्या नात्यात फक्त रिनीसाठीच होता. पण काही वर्षांनी दोघं वेगळे झाले.

जवळपास तीन वर्षांनंतर सुश्मिता आणि रणदीपचे ब्रेकअप झाले. आपल्या या नात्याबद्दल बोलताना रणदीपने सांगितले होते की, आमच्या नात्यात जे अविस्मरणीय क्षण होते ते मी रिनीसोबतच व्यतीत केले होते. सुश्मितासोबत ब्रेकअप करण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. आयुष्यातील फार महत्त्वपूर्ण वर्षे मी या नात्यासाठी दिली होती. तेव्हा काम करण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास माझ्याकडे नव्हता.
सुश्मितासोबतच्या ब्रेकअपनंतर रणदीपचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्यात नीतू चंद्राचे नाव अग्रणी होते. पण रणदीपने मात्र नितूसोबत असलेल्या नात्याबद्दल कधीही खुलासा केला नाही. तो नेहमीच तिला आपली एक चांगली मैत्रीण म्हणूनच सांगत राहिला.

फक्त नितूसोबतच त्याचे नाव जोडले गेले नाही तर ‘मर्डर ३’ सिनेमातील अभिनेत्री अदिती राव हैदरी, ‘दो लफ्जों की कहानी’ सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालसोबतही त्याचे जोडले गेले. म्हटले जाते की, सुश्मितासोबतच्या ब्रेकअपनंतर रणदीपने स्वतःचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला आणि सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख तयार करण्यासाठी स्वतःला कामात झोकून दिले. म्हणूनच कदाचित सुश्मितासोबतच्या ब्रेकअपनंतर त्याचे कोणतेच नाते फार काळ टिकले नाही. पण त्याने आपल्या अभिनयात मात्र फार सुधारणा केली.

रणदीपने हुड्डाने ‘मान्सून वेडिंग’, ‘जिस्म-२’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘साहेब बीवी और गैंगस्टर’, ‘मर्डर-३’, ‘जॉन डे’, ‘हाय-वे’ आणि ‘सरबजीत’ सिनेमांत दमदार अभिनय केला होता.

First Published on August 21, 2017 12:16 pm

Web Title: randeep hooda birthday relationship sushmita sen breakup kajal aggarwal nitu chandra unknown facts