News Flash

रणदीप करतोय हॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘थॉर’सोबत करणार स्क्रीन शेअर

२४ एप्रिलला चित्रपट होणार प्रदर्शित

‘हायवे’, ‘सबरजित’, ‘रंग रसिया’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन करणारा रणदीप हुड्डा आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणदीप नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या आगामी चित्रपटात तो हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थसोबत क्रीन शेअर करणार आहे. सुपरहिरो ‘थॉर’ फेम क्रिस हेम्सवर्थ हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

रणदीपने इन्स्टाग्रामवर ‘एक्सट्रेक्शन’ने पहिले पोस्टर शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीपसोबतच बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत.

‘एक्सट्रेक्शन’ हा एक अॅक्शनपट आहे. हा चित्रपट भारत आणि अमेरिकेच्या सैनिकांवर आधारित आहे. या चित्रपटात रणदीपने भारतीय सैनिकाची तर हेम्सने अमेरिकन सैनिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण भारतातच झाले आहे. ‘एक्सट्रेक्शन’ची पटकथा ‘अॅव्हेंजर्स’चा दिग्दर्शक जो रुसो याने लिहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 1:24 pm

Web Title: randeep hooda hollywood debut in netflix movie extraction mppg 94
Next Stories
1 ‘तेरे बाप की शादी है क्या?’ रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर भडकली अभिनेत्री
2 “रणवीर दिवसातले २० तास झोपलेला असतो, त्यामुळे…”; दीपिकाने सांगितली क्वारंटाइनची कथा
3 ११ बोटांमुळे हृतिक आला अडचणीत; पियानो वाजवणं झालं कठीण
Just Now!
X