19 September 2020

News Flash

ऋषी कपूर यांची तब्येत सुधारतेय, बंधू रणधीर कपूर यांची माहिती

ऋषी कपूर यांच्या पत्नी नितू कपूर यांनी केलेल्या टिट्वमुळे त्यांचे चाहतेही काळजीत पडले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही दिवसांपासून उपचारांसाठी अमेरिकेत आहे. त्यांना नेमकं काय झालं आहे असा काळजीयुक्त सवाल त्यांचे चाहते वारंवार सोशल मीडियावर विचारत आहेत. मात्र कपूर कुटुंबीय अद्यापही या प्रश्नावर मौन बाळगून आहे. त्यातूनच ऋषी कपूर यांच्या पत्नी नितू कपूर यांनी केलेल्या टिट्वमुळे त्यांचे चाहतेही काळजीत पडले आहेत. या पोस्टमधून ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मात्र या चर्चांचं पुन्हा एकदा रणधीर कपूर यांनी खंडन केलं आहे. ऋषी कपूर यांची तब्येतीत सुधारणा होत आहे. लोक काहीही चर्चा करतील मात्र त्यांची तब्येत बरी आहे. ते लवकरच मुंबईत परतणार आहे अशीही माहिती रणधीर कपूर यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर उपचार घेण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतरही ते मुंबईत परतले नव्हते. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तब्येतीविषयी कपूर कुटुंबियांकडे विचारणा केली होती. त्यानंतर ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र त्यावेळीदेखील रणधीर कपूर यांनी या बातमीचं खंडन केलं.

सध्या रीतू कपूर, मुलगी रिधिमा आणि रणवीर कपूर हे तिघंही न्यूयॉर्कमध्येच आहेत. ऋषी कपूर यांनी  कुटुंबीयांसोबत नववर्षानिमित्त वेळ व्यतित केला यावेळी कपूर कुटुंबीयांसोबत पुन्हा एकदा आलिया भट्टदेखील दिसली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 3:54 pm

Web Title: randhir kapoor gave an update about his brother rishi kapoor health
Next Stories
1 ‘रेडू’नंतर आता ‘रापण’
2 ..म्हणून रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले
3 आलिया म्हणते, ११ वर्षांची असल्यापासून मी रणबीरच्या प्रेमात
Just Now!
X