News Flash

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाला डान्सचे डोहाळे, गरोदरपणातही करतेय डान्स

शेअर केला व्हिडीओ

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाला डान्सचे डोहाळे, गरोदरपणातही करतेय डान्स

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत नुकताच दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. या वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. यानिमित्तान कुटुंबातील महिलांनी एक सुंदर नृत्य सादर केलं. या नृत्याचा आनंद दीपाला अनुभवता आला नसला तरी नंतर मात्र तिने एक जबरदस्त डान्स केला आहे.

गरोदर असलेल्या दीपाने डान्स केला हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र दीपाने प्रत्यक्षात डान्स केला असून या दमदार डान्समध्ये तिला इतर महिला कलाकारांची साथ मिळाली आहे. हा डान्स मालिकेसाठी नसून शूटिंगमधून ब्रेक मिळताच पडद्यामागे कलाकारांनी केलेली धमाल आहे. डोहाळे जेवणाच्या सिनसाठी सेटवर सर्व कलाकार उपस्थित होते. शूटिंगमधून वेळ मिळताच मालिकेतील महिला गँगने एकत्र येत वाथी कमिंगवर धमाल डान्स केला आहे. दीपाने म्हणजेच रेश्मा शिंदेने वाथी कमिंगवर ठेका धरला आणि मग सर्वांनीच जबरदस्त डान्स करत धमाल केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

सध्या राज्यातील संचारबंदीमुळे मालिकांचं शूटिंग बंद आहे. अशात रेश्माने पुन्हा एकदा तिचा हा डान्सचा व्हिडीओ शेअर करत. ” माझं काम मिस करतेय.” असं कॅप्शन दिलं आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या नवं वळण आलंय. दीपा लवकरच आई होणार आहे. मात्र दीपावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्तिकला दीपाचा तिरस्कार वाटू लागला आहे. दीपाच्या पोटातील बाळ आपली नाहित असा त्याचा समज झाला आहे. अशा स्थितीत दीपाला सौंदर्याची साथ कशी मिळतेय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 3:22 pm

Web Title: rang majha vegala actor deepa dancing in pregnancy kpw 89
Next Stories
1 ‘हे सर्व तर…’, कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापली मलायका
2 सोशल मीडियावरूनही करणने कार्तिकचा पत्ता कट केला , इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो
3 सर्वसामान्यांना बळ देणारा अभिनेता सोनू सूद करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X