News Flash

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लगीनघाई, नववधूच्या रुपातील दीपाचा लूक लक्ष वेधणारा

सावळ्या रंगाचा तिटकारा असलेली सौंदर्या दीपाचं लग्न कार्तिकशी करुन द्यायला कशी तयार झाली हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या दीपा कार्तिकच्या लग्नाची धावपळ पाहायला मिळतेय. व्याही भोजनाचा शाही कार्यक्रम रंगल्यानंतर मालिकेत शॉपिंग, हळद, मेहंदी आणि लग्नाचा राजेशाही थाट पाहायला मिळणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी देवकुळे आणि इनामदार कुटुंबाची जोरदार तयारी सुरु झालीय.

मालिकेत सौंदर्या इनामदारच्या मर्जीनुसार दीपाचा लूक डिझाईन करण्यात आलाय. या विवाहसोहळ्यासाठी हिरव्या रंगाचा खास ड्रेस दीपासाठी तयार करण्यात आलाय. मालिकेतल्या दीपाच्या या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. मालिकेच्या निमित्ताने नटण्याची सर्व हौस पूर्ण होत असल्याची भावना दीपाची भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने व्यक्त केली.

आणखी वाचा : गुरुनाथला महागात पडणार ‘माया’जाल; राधिका-शनायाने आखला नवा डाव

खरंतर सावळ्या रंगाचा तिटकारा असलेली सौंदर्या दीपाचं लग्न कार्तिकशी करुन द्यायला कशी तयार झाली हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. सौंदर्या खरंच बदलली आहे की यातही तिचा काही डाव आहे याची उत्तर मालिकेच्या पुढील भागांमध्ये मिळतीलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:24 pm

Web Title: rang majha vegla marathi serial updates dipa wedding look ssv 92
Next Stories
1 Coronavirus : करोनाची लागण झाली तर लोकं मरणारच; असंवेदनशील वक्तव्यामुळे अभिनेत्री ट्रोल
2 करोनामुळे घरी बसलेला सलमान पाहा काय करतोय?
3 तेरी फॅमिली को मार दूंगा अगर…,’बिग बॉस’ स्पर्धकाच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी
Just Now!
X