News Flash

व्हॅलेण्टाईन वीकमध्ये ‘रंग माझा वेगळा’मध्ये धमाकेदार ट्विस्ट

काय असेल दीपा आणि कार्तिकच्या नात्याचं भविष्य?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अत्यंत रंजकदार वळणावर आहे. खरंतर फेब्रुवारी महिना म्हटलं तर व्हॅलेन्टाइन डे आणि त्याच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी १४ फेब्रुवारी दिवस खास समजला जातो. कार्तिक-दीपाची लव्हस्टोरी या खास महिन्यात सुरु होईल असं वाटत असतानाच दीपाच्या एका निर्णयाने कार्तिक-दीपाच्या नात्याला पूर्णविराम लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.

एकीकडे कार्तिक दीपाला लग्नासाठी मागणी घालण्याची तयारी करत असताना तिकडे राधाई आणि सौंदर्या इनामदारच्या दबावामुळे दीपाने लेलेंसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सौंदर्या इनामदारला काळ्या रंगाच्या व्यक्तींचा तिटकारा आहे. म्हणूनच कार्तिकसोबत दीपाची असणारी मैत्री त्यांना पटत नाही. होणाऱ्या सुनेची दीपा ही बहिण आहे हे कळल्यापासून तर त्या बेचैन आहेत. म्हणूनच दीपाला आपल्या मार्गातून दूर करण्याठी त्यांनी दीपाच्या आईला तीन दिवसांची मुदत दिली आहे.

आणखी वाचा : ‘बाहुबली’ची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात; लवकरच करणार लग्न?

बहिणीच्या भवितव्यासाठी दीपा स्वत:च्या इच्छेला मुरड घालणार आहे. म्हणूनच इच्छेविरुद्ध ती लेलेंशी लग्न करायला तयार झालीय. त्यामुळे दीपा कार्तिकच्या नात्यांचं भविष्य काय असेल? याची उत्सुकता निर्माण झालीय. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे पुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक असतील यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 4:13 pm

Web Title: rang majha vegla valentine week special major twist in the show ssv 92
Next Stories
1 ऑस्करमध्ये पुन्हा एकदा ए. आर. रहमानचं ‘जय हो’
2 सलमानचा बॉडीगार्ड म्हणतो, ‘हा’ ठरणार बिग बॉस १३ चा विजेता
3 हैदराबाद पोलिसांचं समर्थन करण्याची वेळ येऊ नये हीच न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती – मकरंद अनासपुरे
Just Now!
X