27 February 2021

News Flash

‘रणवीर सिंग खोटारडा’; कंगनाच्या बहिणीची टीका

जाणून घ्या, असं का म्हणाली रंगोली

अभिनेत्री कंगना रणौतची बहिणी रंगोली कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाची पाठराखण करत असते. ट्विटवर ती निर्भीडपणे तिचं मत मांडत असते. तिने आतापर्यंत बऱ्याच कलाकारांवर ताशेरेदेखील ओढले आहेत. यामध्येच आता तिने अभिनेता रणवीर सिंगवर टीकेची तोफ डागली आहे. ‘रणवीर सिंग खोटारडा’ असल्याचं तिने म्हटलं आहे.

अलिकडे एका नेटकऱ्याने रणवीरच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत सोनम कपूर आणि रणबीर कपूरदेखील दिसून येत आहे. फोटो शेअर करुन, “रणवीर खोटारडा असून तो लहानपणापासून रणबीर आणि सोनमला ओळत आहे”, असं म्हटलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर रंगोलीने लगेच त्यावर तिची प्रतिक्रिया दिली.

 वाचा : Video : एकदम झकास…! आजीबाईंच्या डान्सवर आनंद महिंद्रा खूश

“ज्यांचे आई-वडील श्रीमंत असतात. ज्यांची एक ओळख असते आणि संधी उपलब्ध असतात असे लोक बाहेरुन आलेले नसतात. उलटपक्षी जे लहान गावातून येतात, ज्यांना नीट इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यांचं शिक्षणदेखील साध्या शाळेत झालेलं असतं. तसंच ज्यांच्याकडे डिझायनर कपडे नसतात, त्यांना चुकीची वागणूक दिली जाते ते बाहेरुन आलेले असतात, असं रंगोली म्हणाली.

पुढे ती खोचकपणे म्हणते, “या तीन विद्वान व्यक्तींना सहानभूतीची आणि अटेंशनची गरज आहे. चला तर मग या गरजूंची आपण मदत करु”.

दरम्यान, सध्या कंगना तिच्या आगामी ‘पंगा’ चित्रपटात व्यस्त आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अश्विनी अय्यर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘पंगा’मध्ये कंगनासोबत जस्सी गिल, नीना गुप्ता आणि ऋचा चड्ढा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 11:49 am

Web Title: rangoli chandel finds childhood pic of ranveer singh with sonam kapoor and ranbir kapoor challenges his outsider status ssj 93
Next Stories
1 स्ट्रीट डान्सर 3D : ‘या’ टिकटॉक स्टारवरुन तयार झाला वरुणचा लूक
2 सत्तासंघर्षांचा धुरळा
3 Dhurala Movie Review: ‘खुर्ची’ला खिळवून ठेवणारा ‘धुरळा’
Just Now!
X