20 January 2021

News Flash

तापसी पन्नूला ‘सस्ती कॉपी’ म्हणणाऱ्या रंगोलीला अनुराग कश्यपने झापले

तापसी पनूला सुनवणाऱ्या रंगोलीला अनुरागने तिच्याच शब्दात उत्तर दिलं

कंगना रणौतची बहिण रंगोलीने अभिनेत्री तापसी पन्नूला स्वस्त कॉपी असे म्हणत हिणवले. काही लोक कंगनाची कॉपी करून आपले दुकान चालवतात. कंगनाला सुधारण्याची गरज आहे असं तापसीने म्हटलं होतं मात्र तापसीने कंगनाची ‘सस्ती कॉपी’ होणं टाळलं पाहिजे असा खोचक सल्ला रंगोलीने दिला आहे.यानंतर तापसीनेही तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं असं म्हणत उत्तर दिलंय. या दोघींच्या ट्विटरवॉरमध्ये उडी घेत दिग्दर्शक अनुराग कश्यपने रंगोलीला झापले आहे.

ट्विटरवरच्या अशाच काही वक्तव्यामुळे कंगनाची बहिण रंगोली चर्चेत असते. बुधवारी कंगनाच्या ‘जजमेंटल है क्या?’ या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला. इतर फॅन्सप्रमाणे तो अभिनेत्री तापसी पनूनेही पाहिला. तापसीने या ट्रेलचे कौतुक करत हे खूपच कुल आहे, यांच्याकडून नेहमीच जास्त अपेक्षा होत्या आणि हा सिनेमा पैसा वसुल असेल असे ट्विट केले. मात्र या ट्विटला कंगनाच्या बहिणीने उत्तर दिले आहे. रंगोलीने तापसीवर टीका करताना तिला कंगनाची ‘सस्ती कॉपी’ असे म्हटले आहे.

रंगोलीने ही टीका केल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावला आहे. हे जरा अति होते आहे आणि तू जे काही बोलते आहेस ते निराशा करणारे आहे या आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे. तुम्हा दोघींना मी काय सांगणार? पण एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक केल्यावर अशा प्रकारे बोलणे योग्य नाही असे अनुराग कश्यपने रंगोलीला सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:19 pm

Web Title: rangoli chandel said to tapsi pannu a cheap copy anurag kashyap came to support tapasi scj 81
Next Stories
1 बॉयफ्रेंडच्या अचानक मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीची भावनिक पोस्ट
2 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक?
3 ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेनच्या जागी या अभिनेत्रीची वर्णी?
Just Now!
X