News Flash

कंगनाच्या बहिणीचा अभिनेत्याशी ‘पंगा’, म्हणाली ‘तू तर पृथ्वीवरील ओझं’

जाणून घ्या काय आहे प्रकरण..

देशातील घडामोडींवर वादग्रस्त वक्तव्य करुन कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचं ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वी सस्पेंड करण्यात आले. कंगनाच्या विधानांचा सोशल मीडियावर समाचार घेतला जात असतानच तिच्या मदतीला बहिण रंगोली धावून आली आहे. कंगनाला विनोदवीर असं म्हणत तिची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्याला रंगोलीने खडसावले आहे.

ऑक्सिजन प्लांट संदर्भात कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटवरून तिची खिल्ली उडवण्यात आली होती. टीव्ही अभिनेता करण पटेलनही या ट्विटवरुन कंगनाची खिल्ली उडवली होती. ‘ही महिला देशातील सर्वोत्तम विनोदवीर आहे’, अशा आशयाचे ट्विट त्यानी केले होते.

करण पटेलचं हे ट्विट कंगनाची बहिण रंगोलीच्या जिव्हारी लागलं. तिने कठोर शब्दात करणवर निशाणा साधला. ‘तू देशातील सर्वात रिकामटेकडी व्यक्ती आहेस का. ज्याने कधीही पर्यावरणासाठी काही केलेले नाही आणि तू पृथ्वीवर ओझे आहेस’ असे रंगोलीने म्हटले आहे.

वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत कंगनाचे अकाऊंट बंद करण्यात येत असल्याचे ट्विटरने नुकतेच जाहीर केले होते. प्रत्यक्षात एखाद्याला दुखापत करण्यासंदर्भातील वक्तव्य करणे, द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा वापरुन टीका करणे हे ट्विटरच्या पॉलिसीनुसार चुकीचे आहे. अशाच काही नियमांचे कंगनाने उल्लंघन केल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 5:08 pm

Web Title: rangoli chandel slamis karan patel as he called kangana funny stand up comedian avb 95
Next Stories
1 “आजच्या दिवशी तिने मला ‘हो” म्हणलं”; सुबोध भावेची पोस्ट चर्चेत
2 गोव्यात १० मे पर्यंत शूटिंग बंद , ‘या’ मालिकाचं चित्रीकरण पुन्हा रखडलं!
3 गायक अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती बिघडली; कोलकत्ताच्या रूग्णालयात दाखल
Just Now!
X