सध्या जगभरातील लोक करोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. १०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी सोशल मीडियाव्दारे करोनापासून सुरक्षित राहण्याचे सल्ले देताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रयत्न एका अभिनेत्रीने केला होता. मात्र यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

कोण आहे ही अभिनेत्री आणि का झाली ट्रोल?

ही आहे भोजपूरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी. करोनापासून स्वत:चा बचाव कसा करावा? हे सांगण्यासाठी तिने एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिने लोकांना मास्क लाऊन फिरण्याचा सल्ला दिला आहे. परंतु स्वत: मात्र मास्क लावलेला नाही. यातील गंमतीशीर तिचं मास्क ती घरी विसरली असं सांगताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

राणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मास्क वापर. करोना घेऊन येऊ नकोस. मास्क नसेल तर रुमाल वापर असा सल्ला देत अनेकांनी तिची खिल्लीही उडवली आहे.