29 September 2020

News Flash

सोशल मीडियावर ‘या’ व्यक्तीच्या आक्षेपार्ह कमेंटमुळे अभिनेत्रीने दिली आत्महत्येची धमकी

तिने पोस्टद्वार ही धमकी दिली आहे.

भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट केली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने आत्महत्या करण्यासंबंधी देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने या सर्वाला एका नेटकऱ्याला जबाबदार ठरवले आहे.

राणी चॅटर्जीने फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, ‘मी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये आहे. मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मी सकारात्मक वागू शकत नाही. एक व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून माझ्याबाबतील आक्षेपार्ह गोष्टी फेसबुकवर लिहित आहे. मी या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मी या विषयावर अनेकांशी बोलले. त्यांनीही मला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. पण मी एक माणूस आहे. मी या गोष्टीमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मानसिक तणावाचा सामना करत आहे. बहुतेक मी जीव द्यावा असे या व्यक्तीला वाटत आहे’ असे म्हटले आहे.

‘माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की जर मी माझ्या जीवाचे काही बरे वाईट केले तर त्यासाठी धनंजय सिंह ही व्यक्ती जबाबदार असेल. मी सायबर सेलमध्येही त्याची तक्रार केली, पण त्याने माझे नाव लिहिले नाही असे त्यांनी मला सांगितले. पण मला माहित आहे हा व्यक्ती फक्त माझ्यासाठी लिहित असतो. आता या व्यक्तीमुळे मी आणखी सहन करु शकत नाही, आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत, कारण या सर्वामुळे मी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये आहे. आता मला आणखी सहन होत नाही’ असे तिने पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 1:18 pm

Web Title: rani chatterjee wrote facebook post about her depression reason avb 95
Next Stories
1 घरी राहून ‘मस्तानी’ करते अभ्यास? जाणून घ्या, दीपिका नेमकं काय शिकते
2 हॉटस्टारच्या वादात कंगना रनौतची उडी; विद्युत जामवालला दिला पाठिंबा
3 अक्षय कुमारने घराणेशाहीवर साधला निशाणा; मुलगा आरवला दिला सूचक इशारा, म्हणाला…
Just Now!
X