07 March 2021

News Flash

‘हिचकी’मधून राणी करणार पुनरागमन

लवकरच या सिनेमाचे चित्रिकरण सुरु होईल

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी

सात वर्षांपूर्वी ‘वी आर फॅमिली’ या सिनेमातून दिग्दर्शनामध्ये पदार्पण केल्यानंतर सिद्धार्थ पी. मल्होत्रा आता नवीन सिनेमा घेऊन यायला सज्ज झाला आहे. त्याची एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली असेच म्हणावे लागेल. कारण त्याच्या आगामी सिनेमात राणी मुखर्जी असणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंय.. सिद्धार्थ पी, मल्होत्राच्या आगामी सिनेमातून राणी पुनरागमन करणार आहे. सध्या तरी ‘हिचकी’ असे या आगामी सिनेमाचे नाव ठरवण्यात आले आहे.

राणीने २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ या सिनेमात शेवटचे काम केले होते. त्यानंतर राणीने कुटुंबाकडे आणि मुलीकडे अधिक लक्ष देण्यास प्राधान्य दिले. पण आता तीन वर्षांनंतर ती सिनेसृष्टीत पुन्हा एकदा परत येत आहे. ‘हिचकी’मध्ये राणी एक प्रेरणादायी व्यक्तिरेखा साकारत आहे. जी स्वतःचे खच्चिकरण करणाऱ्या गोष्टींनाच कालांतराने आपले बलस्थान बनवते. आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना राणी म्हणाली की, मी अशा संहितेच्या शोधात होती जी आव्हानात्मक असेल. तेव्हाच माझ्याकडे हिचकीची संहिता आली.

प्रत्येकाच्याच काही कमकुवत बाजू ज्या नेहमी आपल्याला मागे खेचत असतात. मग ते एखादं व्यंग असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट. पण आपण त्याच्याकडे फक्त एक उचकी असेच पाहिले तर आपण अर्धी स्पर्धा तिथेच जिंकतो. आपल्या यशामध्ये या गोष्टी कधीच येणार नाहीत. हिचकी हा सिनेमा याच सकारात्मक गोष्टीवर आधारीत असल्यामुळे मी या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.

या सिनेमाबद्दल आणि राणीसोबत काम करण्याबद्दल दिग्दर्शक सिद्धार्थने इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी तिच्यासोबत काम करायला फार उत्सुक आहे. मी स्वतः राणीचा फार मोठा चाहता आहे. या सिनेमासाठी राणीच योग्य आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून यश राज यांच्या कुटुंबियांना ओळखत आहे. पण तरीही माझी कोणाशी व्यक्तिगत ओळख नाही. या सिनेमाच्या कथेनेच मला, मनीषला आणि आदित्यला एकत्र आणले. या संहितेवर मी चांगले काम करु शकतो असा त्यांचाच विश्वास होता. त्यामुळे आता मला स्वतःला सिद्ध करुन दाखवायचं आहे, हे खरंच एक मोठं दडपण आहे.

राणीसोबत कोणता अभिनेता काम करणार हे अजून ठरले नसले तरी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्या नावामध्ये साम्य असल्यामुळे राणीसोबत सिद्धार्थ काम करणार असा संभ्रम काही दिवसांपूर्वी झाला होता. पण सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरु तो या सिनेमात नसल्याचे स्पष्ट केले.

लवकरच या सिनेमाचे चित्रिकरण सुरु होईल. एक निर्माता म्हणून मनीषचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी मनीषने यश राजसोबतच ‘दम लगा के हैशा’ आणि आगामी ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. असे असले तरी सिद्धार्थ मात्र पहिल्यांदाच यश राजसोबत काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 2:52 pm

Web Title: rani mukerji comeback film hichki siddharth p malhotra
Next Stories
1 ‘हॉलीवूडने श्रद्धांजली वाहिलेल्या ओम पुरींना बॉलीवूड विसरले’
2 कोकेन घेणाऱ्या अभिनेत्रीवर आली तोंडघशी पडण्याची वेळ; शेखर सुमनचा कंगनाला उपरोधिक टोला?
3 करणच्या शोमध्ये कपिलची विनोदी फटकेबाजी
Just Now!
X