मुलगी आदिराच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदाच दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र सुत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, मल्होत्रा यांच्यासोबत राणी कोणताही चित्रपट करणार नसल्याचे समजते. बॉलिवूडमध्ये रंगलेल्या चर्चेनुसार, महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपटातून राणी मुखर्जी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र महिलांची प्रमुख भूमिका असणारा असा कोणताही चित्रपट सध्या बॉलिवूडमध्ये झळकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राणीच्या पुनरागमानासाठी तिच्या चाहत्यांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्राच्या आयुष्यात २०१५ मध्ये आदिरा म्हणजेच त्यांच्या चिमुकलीचे आगमन झाले होते. तेव्हापासून सहसा राणी स्वत:सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर कमीच आली. पण तिने आदिरालासुद्धा छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांपासून दूरच ठेवले. त्यानंतर राणीने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीच्या फोटोसोबत तिने लिहिलेले पत्राची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘मी आता खुपच शांत, सहनशील आणि इतरांच्या चुका समजून घेणारी बनले आहे. हे सर्व एका क्षणामध्येच झाले. माझ्यामध्ये झालेला बदल मी सुद्धा ओळखला. हा बदल कोणा एका चांगल्या कारणासाठीच असावा असं मला वाटतं. मी अशी आशा करते की आदिरालासुद्धा मी चांगले वाढवू शकेन, चांदले संस्कार देऊ शकेन. सर्वांना तिचा गर्व वाटावा असंच मला वाटत आहे. तर कोणालाही तिचा गर्व वाटला नाही तरीही मला नेहमीच तिचा गर्व वाटत राहिल’, असे राणीने या पत्रात लिहिले होते.‘माझं माझ्या मुलीवर खुप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही’. राणीचे मुखर्जी बॉलिवूडमधल्या अशा शब्दात राणीने तिच्या मुलीवरील प्रेम व्यक्त केले होते.
काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये योग्य तो समतोल राखला आहे. राणी मुखर्जी ‘परफेक्ट मॉम’ आहे असेच म्हणावे लागेल. ही ‘परफेक्ट मॉम’ २०१४ मध्ये मर्दानी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता तिच्या पुनरागमनासाठी चाहते नक्कीच आवश्यक आहे.

 

मुलगी आदिराच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसली होती. नवरात्रीसाठी दुर्गा पूजा मंडपामध्ये राणी देवीच्या दर्शनाला आली होती. यावेळी राणीने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बनवण्यात आलेल्या ठिकाणाहून प्रवेश करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेण्यास पसंती दिल्याचे पाहायला मिळाले होते.