News Flash

आदित्यला मला चित्रपटात न घेण्याचा देण्यात आला होता सल्ला, राणीने केला खुलासा

राणीने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे.

प्रत्येक अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्या ना कोणत्या शोमध्ये जाताना दिसतो. त्यावेळी ते त्यांच्या आयुष्यातील अनेक खाजगी गोष्टींचा खूलासा देखील करतात. २०१८मध्ये राणी मुखर्जी तिच्या ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहा धुपियाच्या ‘बीएफएफस विथ वोग’ या टॉक शोमध्ये आली होती. त्यावेळी राणीने तिच्या आयुष्यातील एक मोठा खुलासा केला.

नेहा धुपियात्या ‘बीएफएफस विथ वोग’ या टॉकशोमध्ये राणी तिच्या सगळ्यात जवळचा मित्र फॅशन डिझायनर सभ्यसाची सोबत आली होती. यावेळी राणी आदित्य चोप्राशी तिची भेट कशी झाली याबद्दल बोलत होती. “माझे २ चित्रपट सलग फ्लॉप झाले. नंतर सुदैवाने ‘मुझसे दोस्ती करोगी’ हा चित्रपट मला मिळाला आणि तेव्हाच मी आदिशी पहिल्यांदा भेटली. तेव्हा त्याने मला सांगितले की, मी चूकीचे चित्रपट निवडते, आणि त्यामुळे अनेकांनी त्याला सांगितले की राणीला तू घेऊ नकोस. कारण यश राजच्या चित्रपटात येण्यासारखे माझ्यात काही नाही असे ते लोक त्याला म्हणाले होते. पण आदिला माझ्या आणि माझ्या कामावर विश्वास असल्याने त्याने मला या चित्रपटासाठी विचारले. मी आणि माझी आई आम्ही दोघे कोणतीही गोष्ट समोर बोलण्यावर विश्वास ठेवतो, आणि मला स्पष्टपणा आणि मोकळेपणा आवडतो” असे राणी म्हणाल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

राणी मुखर्जी तिच्या नवऱ्याबद्दल बोलताना पुढे म्हणाली, “माझ्यासाठी माझा नवरा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. मी त्याच्याशी खूप वेळा भांडते. मी माझ्या नवऱ्याला टोचून बोलते, मी त्याला दररोज खूप काही बोलते, तो सगळ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करतो की जे पण मी त्याला बोलते ते माझ्या तोंडातून प्रेमाने निघतं. आमच्या कुटुंबात जेव्हापण आम्ही कोणाशी भांडतो किंवा काही बोलतो ते प्रेमाने असतं. आम्ही रागात कधीच कोणाशी भांडत नाही. जर मी एखाद्या व्यक्तीशी भांडते याचा अर्थ असा की मला त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 11:54 am

Web Title: rani mukerji once revealed aditya chopra telling her that shes doing crap films people pressured him not to take me dcp 98
Next Stories
1 ‘बॉम्बे बेगम्स’समोर नव्या अडचणी; कायदेशीर कारवाईचा इशारा
2 तापसी पन्नू होणार नव्या घरात शिफ्ट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
3 ठरलं! ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास-सैफसोबत दिसणार ही अभिनेत्री
Just Now!
X