17 February 2019

News Flash

शाळेत असताना मी पहिल्यांदा आमिरला भेटले, राणीनं सांगितला न ऐकलेला किस्सा

त्यावेळी मिस्टर परफेक्शनिस्टऐवजी आमिरची ओळख बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अशी होती. राणी चंदेरी दुनियेपासून बरीच लांब होती.

राणी आणि आमिरनं 'गुलाम''मंगल पांडे', 'तलाश', यांसारख्या चित्रपटातून काम केलं.

राणी मुखर्जी आणि आमीर खान यांनी ‘गुलाम’, ‘मंगल पांडे’, ‘तलाश’, यांसारख्या चित्रपटातून काम केलं. आमिर आणि राणीची जोडी रुपेरी पडद्यावरची हिट जोडी मानली जाते. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टसोबत काम करण्याची इच्छा अनेकींना आहे. राणी ज्यावेळी शाळेत जायची तेव्हापासून ती आमिरची सर्वात मोठी चाहती होती. शाळेतील कधीही न ऐकलेला किस्सा तिनं नुकताच एका मुलाखतीत सांगितला.

त्यावेळी मिस्टर परफेक्शनिस्टऐवजी आमिरची ओळख बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अशी होती. राणी चंदेरी दुनियेपासून बरीच लांब होती. यावेळी पहिल्यांदा चाहती म्हणून तिची आमिरशी भेट झाली होती. ‘मला आमिरचा ऑटोग्राफ हवा होता. त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी सगळ्याच धडपडत होत्या. मी त्याच्याजवळ गेले आणि ऑटोग्राफ मागितला त्यानं तो दिला आणि पुन्हा त्याच्या कामात गुंतला. पुढे जाऊन याच आमिरसोबत काम करण्याची संधी मला मिळेल याचा विचार मी कधीही केला नव्हता असं म्हणत राणीनं आमिरसोबतची आपली पहिली भेट सांगितली.

नुकतंच राणीला ‘हिचकी’मधील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्कारानं मेलबर्नमधील ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरवण्यात आलं.

First Published on September 11, 2018 11:12 am

Web Title: rani mukerji reveals when she first time meet aamir khan