News Flash

राणी मुखर्जीने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो

या फोटोसोबतच राणीने तिच्या मातृत्त्वाबद्दलचे एक पत्रही लिहिले आहे

छाया सौजन्य- सोशल मीडिया

गेल्या काही काळापासून अभिनेत्री राणी मुखर्जी प्रसारमाध्यमं आणि छयाचित्रकारांपासून दूरच राहात होती. पण राणीने पुन्हा अकदा अनेकांचेच लक्ष वेधले आहे ते म्हणजे एका फोटोमुळे. अभिनेत्री राणी मुखर्जीचा तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्तेत आहे. या फोटोसोबतच राणीने एक पत्रही लिहिले आहे. ज्यामधअये तीने स्वत:चा आई होण्याचा प्रवासही वर्णनात्मकपणे लिहिला आहे. त्यामुळे आनंद, उस्ताह, आशा अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारे हे पत्र फक्त कोणा एका आईसाठीच नाही तर सर्वच पाल्यांच्या पालकांसाठी असून प्रत्येकजण त्याच्याशी स्वत:ला जोडू शकतो.

मागच्या वर्षी राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्राच्या आयुष्यात आदिरा म्हणजेच त्यांच्या चिमुकलीचे आगमन झाले. तेव्हापासून सहसा राणी स्वत:सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर कमीच आली. पण तिने आदिरालासुद्धा छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांपासून दूरच ठेवले. राणीने नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या मुलीच्या फोटोसोबत तिने लिहिलेले पत्र तिच्या मातृत्त्वावरही भाष्य करत आहे. ‘मी आता खुपच शांत, सहनशील आणि इतरांच्या चुका समजून घेणारी बनले आहे. हे सर्व एका क्षणामध्येच झाले. माझ्यामध्ये झालेला बदल मी सुद्धा ओळखला. हा बदल कोणा एका चांगल्या कारणासाठीच असावा असं मला वाटतं. मी अशी आशा करते की आदिरालासुद्धा मी चांगले वाढवू शकेन, चांदले संस्कार देऊ शकेन. सर्वांना तिचा गर्व वाटावा असंच मला वाटत आहे. तर कोणालाही तिचा गर्व वाटला नाही तरीही मला नेहमीच तिचा गर्व वाटत राहिल’, असे राणीने या पत्रात लिहिले आहे.

मातृत्त्वाच्या प्रवासाविषयी राणीने लिहिले आहे की, ‘माझं माझ्या मुलीवर खुप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही’. राणीचे मुखर्जी बॉलिवूडमधल्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये योग्य तो समतोल राखला आहे. लग्नानंतरही राणीने तिचे चित्रपटसृष्टीतील काम सुरुच ठेवले. त्यामुळे राणी मुखर्जी ‘परफेक्ट मॉम’ आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 11:24 am

Web Title: rani mukerji shares daughter adiras pic pens a letter which will touch your heart read letter here
Next Stories
1 ..हे केवळ रणवीरलाच जमू शकते
2 फेब्रुवारीत रंगणार चित्रपटांचा महोत्सव!
3 तिसरी गोष्ट: १२ मार्च १९९३ मुंबई बॉम्बस्फोट
Just Now!
X