News Flash

Photo : राणी मुखर्जीचा ‘हा’ लूक पाहून नेटकरी म्हणतात, ‘लेडी बप्पीदा’

पाहा, कोणत्या लूकमुळे राणी झाली ट्रोल

राणी मुखर्जी

मुंबई पोलिसांच्या वतीनं रविवारी ‘उमंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलिवूडच्या कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.मात्र, या साऱ्यांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते कलाविश्वातील अभिनेत्रींनी. प्रियांका चोप्रापासून ते विद्या बालनपर्यंत अनेक अभिनेत्रींनी या कार्यक्रमात साडी नेसून हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं होतं. तर दुसरीकडे मात्र अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या लूकमुळे ट्रोल व्हावं लागलं. इतकंच नाही तर तिचा लूक प्रसिद्ध गायक बप्पी लहरींसारखा असल्याचं म्हणतं नेटकऱ्यांनी तिची खिल्लीही उडविली.

या कार्यक्रमामध्ये अधिकांश अभिनेत्रींनी पारंपरिक लूकमध्ये हजेरी लावली होती. तर राणीने मात्र गोल्डन रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता. विशेष म्हणजे तिचा लूक हुबेहूब बप्पी लहरींप्रमाणे वाटत होता. त्यामुळे तिचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 

राणीने या लूकची प्रेरणा बप्पीदांपासून घेतल्यांच काहींनी म्हटलं आहे. तर ‘ही लेडी बप्पीदा आहे’, असं काहींचं मत आहे. इतकंच नाही तर तिला मायकेल जॅक्सनही एकाने म्हटलं आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर बरेचसे सेलिब्रिटी त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे ट्रोल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

#RaniMukherjee for #Umang2020 in Mumbai today #Sunday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on


दरम्यान, या कार्यक्रमात राणी मुखर्जीसह सलमान खान, कतरिना कैफ, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, कार्तिक आर्यन, सारा अली खान, रकुल प्रीत, विद्या बालन, अनन्या पांडे, उर्वशी रौतेला, अर्जुन कपूर, विक्की कौशल आणि अन्य बरेच कलाकार उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:57 am

Web Title: rani mukerji trolled on social media as she attend umang 2020 in shimmer outfit ssj 93
Next Stories
1 योगेश सोमण यांना ‘मुक्ता’चा पाठिंबा
2 “तिचं पोट बघा,” म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अनुष्का शर्माचे जबरदस्त उत्तर; म्हणाली….
3 ‘टिक टॉक’च्या व्हिडीओवरून कंगनाने घेतला दीपिकाशी पंगा, म्हणाली…
Just Now!
X