16 November 2019

News Flash

‘मर्दानी 2’च्या सेटवर राणी मुखर्जीला मिळाली ही खास भेट

या चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचे हे कौतुक आहे.

राणी मुखर्जी

बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी अभिनेत्रींसोबत अभिनेता हा हवाच पण, हे समीकरण राणी मुखर्जीने कित्येक वर्षांपूर्वी खोडून काढलं. ‘नो वन किल जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ अशा दमदार कथानकाच्या जोरावर तिनं अभिनेत्याविनाच चित्रपट सुपरहिट करून दाखवले. आता राणीच्या ‘मर्दानी’चा सिक्वल येत आहे. राणी गेल्या महिन्यापासून ‘मर्दानी 2’ चे राजस्थानमध्ये शूटिंग करत आहे.

‘मर्दानी 2’ चे राजस्थानमधील शूटिंग संपल्यानंतर या चित्रपटाचे आर्ट डिरेक्टर बाबू सैनी यांनी राणीला एक खास गिफ्ट दिले आहे. राणी व बाबू यांनी याआधी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर बाबू यांनी स्वतः काढलेले एक चित्र राणीला भेट दिले आहे. बाबू जयपूरमधील सुप्रसिद्ध कलाकार असून राणीच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांनी तिला ही खास भेट दिली आहे. या चित्रामध्ये राणी डॅशिंग पोलीसाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचे हे कौतुक आहे.

एका वृत्तानुसार, ‘जेव्हा सैनी यांनी राणीला हे पोट्रेट दिले तेव्हा ती खूप भावुक झाली होती. ‘मर्दानी 2’मधील तिच्या लूकचे हे चित्र आहे. “मी हे चित्र आवर्जून माझ्या घरात लावेन.” असं राणीने त्यांना सांगितलं. यातून हेच दिसून येतं की, चित्रपटासाठी काम करणाऱ्या सगळ्यांच्याच मनात राणीविषयी प्रेम व आदर आहे.

‘मर्दानी 2’चे शूटिंग संपत आले असून,मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण होणार आहे. ‘शिवानी शिवाजी रॉय’ या महिला पोलीस अधिकारीची भूमिका राणी साकारत आहे.

First Published on June 13, 2019 10:44 am

Web Title: rani mukharji mardani 2 gift djj 97