बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांनी सोमवारी (२१ एप्रिल) इटली येथे गुपचूप विवाह केला आहे.
राणी आणि आदित्य यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा गेली कित्येक वर्ष सुरु होती. अखेर, यांच्या नात्यावर काल इटली येथे लग्नाची मोहोर लागली. विवाह करून परतलेल्या या प्रेमीयुगुलाने चाहत्यांना धक्काच दिला आहे. चित्रपट समीक्षक तरन आदर्श आणि यशराज फिल्म्सने यांनी या बातमीस दुजोरा देणारे ट्विट केले आहे.

 

या जोडप्याने कधीच आपल्यात प्रेमसंबंध असल्याच्या बातमीला स्वीकारलेले नाही. मात्र, राणी मुखर्जी चोप्रा कुटुंबाशी निगडीत सर्व समारंभात त्यांच्यासोबत दिसायची. यापूर्वी राणी आणि आदित्य हे १४ फेब्रुवारीला जोधपूर येथील उमैद भवन येथे लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण, बहुतेक दोघांचा विचार बदलला असावा. असो, या दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!