News Flash

रानू मंडल विसरल्या स्वत:चच गाणं, पाहा व्हिडीओ…

सेलिब्रिटी स्टेटस मिळवलेल्या रानू यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली.

प्रतिभावान कलाकाराला जर अपेक्षित संधी मिळाली तर तो कलाकार काय करुन दाखवू शकतो याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपले पोट भरणाऱ्या रानू मंडल यांना गायक हिमेश रेशमीया याने आपल्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात स्टार झाल्या.

सेलिब्रिटी स्टेटस मिळवलेल्या रानू यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त करत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना हिमेश रेशमीया बरोबर गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली गेली. परंतु हातात माईक घेताच त्या गाणे विसरल्या. या घटनेतील आवाक् करणारी बाब म्हणजे रानू मंडल यांना ‘तेरी मेरी’ या गाण्यामुळेच प्रसिद्धी मिळाली होती. याच गाण्याने त्यांना रातोरात सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिले होते. आणि त्याच गाण्याच्या ओळी त्यांना आठवेनासे झाले.

कार्यक्रमात काय घडले? पाहा व्हिडीओ…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परंतु हा प्रसंग कुठल्या कार्यक्रमात घडला याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. याआधी रानू मंडल एका रिअॅलिटी शोमध्ये मल्याळम भाषेत गायलेल्या गाण्यामुळे चर्चेत होत्या. या कार्यक्रमात त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर एक मल्याळम गाणे गायले होते. त्यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले हे गाणे पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:43 pm

Web Title: ranu mandal forget her own song mppg 94
Next Stories
1 दीपिकाच्या विनंतीवर कार्तिक म्हणाला…
2 चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे नंतर काय होते? जाणून घ्या
3 प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय ‘गोलमाल-५’
Just Now!
X