X
X

रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

READ IN APP

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू येईल

सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडल यांचा काही महिन्यांपूर्वी गाणे गातानाचा व्हिडीओ चर्चेत होत्या. या व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडल रातोरात स्टार झाल्या. आता रानू मंडल अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात गाणे गाताना दिसत आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती रानू मंडल यांच्या एका फोटोची. या फोटोमध्ये रानू मंडल यांनी मेकअप केला असल्याचे दिसत आहे.

रानू मंडल यांचा व्हायरल झालेला फोटो एका कार्यक्रमतील आहे. या कार्यक्रमात त्यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला आहे. तसेच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमझध्ये रानू रॅम्पवर वॉक करताना दिसत आहेत. रॅम्प वॉक करताना अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चित्रपटातील ‘फॅशन का है ये जलवा’ हे गाणे सुरु असल्याचे पाहायला मिळते. मात्र रानू यांचा हा लूक चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे पाहायला मिळते. नेटकऱ्यांनी रानू यांच्यावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताता स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले होते. रानू यांचे वेगळे वागणे पाहून महिला त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. ज्या नेटकऱ्यांनी रानू यांना रातोरात स्टार केले त्याच नेटकऱ्यांनी रानू यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी फटकारले होते.

23
X