01 June 2020

News Flash

प्रदर्शनापूर्वीच रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकूळ

या गाण्याचे नाव 'आदत' असे आहे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संपूर्ण आयुष्य बदलेल्या गायिका म्हणजे रानू मंडल. त्यांनी बॉलिवूड अभिनेता, गायक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले. या गाण्यानंतर रानू यांची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच या गाण्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली. ‘तेरी मेरी कहानी’ गाणे सुपरहिट झाल्यानंतर रानू पुन्हा त्यांचे आगमी गाणे, ‘आदत’ने लोकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी जोरदार तयारी करत होत्या.

नुकताच रानू यांच्या ‘आदत’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला असून तो आता पर्यंत ७७ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. खुद्द हिमेश रेशमीयाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान हिमेशने रानू यांचा आवाज खूप मधूर असल्याचे म्हटले आहे. ‘आदत गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यान मला जाणवले की रानू मंडल या वन सॉंग वंडर नाहीत. जेव्हा तुम्ही आदत हे गाणे ऐकाल तेव्हा तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. त्यांचा आवाज खूप मधूर आणि अष्टपैलू आहे आणि ही एक महान प्रतिभा आहे’ असे हेमिशने कॅप्शन दिले आहे.

‘आदत’ या गाण्यानंतर रानू मंडल हिमेशचे ‘आशिकी में तेरी..’ हे गाणे गाणार आहेत. यापूर्वी रानू यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते. रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणणाऱ्या रानू यांचे व्हायरल झालेले गाणे ऐकून हिमेशने त्यांना त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आणि रानू रातोरात स्टार झाल्या. या पहिल्या गाण्यासाठी हिमेशने रानू यांना जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 1:19 pm

Web Title: ranu mandal second song aadat track video is viral avb 95
Next Stories
1 भन्साळींच्या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा कोण आहे अभय वर्मा?
2 प्रेक्षकांना धडकी भरवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; श्याम रामसे यांचे निधन
3 खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; उपस्थित केले ‘अज्ञानी माणसाचे प्रश्न’
Just Now!
X