News Flash

सोनम कपूरने केले रणवीर- दीपिकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब?

दीपिका तिच्या व्यग्र कारभारातून वेळ काढत रणवीरच्या आई आणि बहिणीसोबत लग्नाच्या तयारीला लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बी- टाऊनमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागत आहेत. दोघांनीही अनेक मुलाखतीत त्यांच्या नातेसंबंधांवर मोकळेपणाने बोलले आहेत. यावर्षी रणवीर आणि दीपिका लग्नबंधनात अडकणार आहेत असे म्हटले जात आहे. पण दोघांनीही या बातमीला अजूनपर्यंत दुजोरा दिलेला नाही. पण आता खुद्द सोनम कपूरने रणवीर- दीपिकाच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोनमच्या बोलण्यावरून तरी ज्या आतपर्यंत फक्त अफवा वाटत होत्या ती सत्य गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

कान चित्रपट महोत्सवात सोनम कपूर गेली असता तिथे आज तक वाहिनीने तिची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीतच सोनमने रणवीर- दीपिकाच्या नात्यावर आणि त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सोनम म्हणाली की, रणवीर आणि दीपिकाचे लवकरात लवकर व्हावे अशी इच्छा आहे. कपूर कुटुंबिय दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.’

सोनमच्या या वक्तव्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात की, दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत आहेत ही गोष्ट खोटी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाची बातमीही फक्त अफवा नाही. काही दिवसांपूर्वी दीपिकाने तिच्या लग्नाची खरेदी सुरू केली असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

दीपिका तिच्या व्यग्र कारभारातून वेळ काढत रणवीरच्या आई आणि बहिणीसोबत लग्नाच्या तयारीला लागली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दीपवीर अर्थात दीपिका आणि रणवीर लग्न करतील असे म्हटले जात आहे. पण अजूनही त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. गोलियों की रासलिला रामलीला सिनेमाच्या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली. हळहूळ या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रामलीलानंतर दोघांनी बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सिनेमांत एकत्र काम केले. हे तीनही सिनेमे ब्लॉकबस्टर होते. आता हे प्रेमीयुगूल स्वतःहून त्यांच्या लग्नाबद्दल कधी सांगतील याचीच वाट त्यांचे चाहते पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 7:18 pm

Web Title: ranveer and deepika can get tie knot soon sonam kapoor gave the hint
Next Stories
1 बॉबी डार्लिंगचा नवरा गजाआड, अनैसर्गिक सेक्स आणि मारहाणीचा आरोप
2 एकट्या बाईवर समाज ‘अॅव्हेलेबल’चे लेबल सहज लावतो- नीना गुप्ता
3 ‘संजू’ची आतुरतेने वाट पाहणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Just Now!
X