News Flash

“मला जगात सर्वात जास्त गर्व या गोष्टीचा आहे की……”- रणवीर सिंग

दिपीकासाठी लिहिला एक भावूक करणारा संदेश

अभिनेत्री दिपीका पादुकोनने काल आपली स्वतःची एक वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगसह अनेकांनी तिच्यासाठी काही खास मेसेज लिहिले आहेत. पण त्यापैकी रणवीरचाच मेसेज सर्वात खास आहे. काय आहे कारण, जाणून घेऊया.

दिपीकाच्या या वेबसाईटवर तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तिचे सर्व फोटो, तिच्या नव्या चित्रपटांविषयी, तिच्या जाहिरातींविषयी सर्व काही या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. या तिच्या वेबसाईटवर एक बायोग्राफी असा विभागही आहे. या विभागात तिचे मित्रमंडळी, तिचे सहकारी यांनी तिच्याबद्दल लिहिलेल्या काही गोष्टी आहेत. तिचा पती तसेच अनेक चित्रपटातला सहकलाकार रणवीर सिंग याने लिहिलेला संदेशही यावर आहे. तो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दिपीका आणि रणवीर हे बॉलिवूडमधलं कायम चर्चेत असणारं कपल आहे. ते सतत नेटिझन्सना कपल गोल्स देत असतात. रणवीरने लिहिेलेल्या या संदेशामुळेही नेटिझन्स अगदी भारावून गेले आहेत. यात रणवीर म्हणतो, “दिपीका ही मला भेटलेली सर्वात चांगली व्यक्ती आहे. हे मी ती माझी पत्नी हे म्हणून म्हणत नाही. दिपीकाचे अनेक चांगले गुण आहेत जसे की तिची बुद्धिमत्ता, सौंदर्य, अदाकारी, स्वतःविषयीचं प्रेम, तिची दयाळू वृत्ती. या सगळ्या गोष्टी तिला एक उत्कृष्ट कलाकार बनवतात. ती जगातल्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. ती खूप स्पेशल आहे आणि मला जगात सर्वात जास्त या गोष्टीचा गर्व आहे की मी तिचा पती आहे.”

रणवीरशिवाय दिग्दर्शक फराह खान, जी दिपीकाच्या ‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटाची दिग्दर्शक होती, तिनेही या वेबसाईटवर दिपीकाविषयी लिहिलं आहे. तसंच दिपीका-रणवीरचा आगामी चित्रपट ‘८३’ चा दिग्दर्शक कबीर खान यानेही या दिपीकाविषयी लिहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:39 pm

Web Title: ranveer shares an emotional message for deepika vsk 98
Next Stories
1 ही गोड मुलगी करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य; ओळखलं का ‘या’ अभिनेत्रीला?
2 जया यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोरच रेखाच्या कानशिलात लगावली अन्…
3 करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर अनुषा म्हणाली, “… त्यानेच मला उद्धवस्त केलं”
Just Now!
X