26 September 2020

News Flash

झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात पाहता येणार आलिया-रणवीरची केमिस्ट्री

रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे

छाया सौजन्य- सोशल मीडिया

सध्या चित्रपट निर्माते विविध प्रकारच्या प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यात विविध धाटणीच्या चित्रपटांद्वारे बऱ्याच नव्या जोड्याही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशीच काही जोड्यांमधील एक नवी जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांची. सध्या एका जाहिरातीच्या निमित्ताने आलिया आणि रणवीरचा गुजराती बाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही सुपरक्युट जोडी एका चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झोया अख्तरच्या आगामी ‘गल्ली बॉय’ या चित्रपटामध्ये या दोन्ही कलाकारांची वर्णी लागली आहे. या चित्रपटाच्या नावावरुन तरी सध्या चित्रपटाबद्दल कोणतेही अंदाज बांधणे कठीण आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच एका चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.


रणवीर सिंगने याआधीडी झोया अख्तरसोबत दिल धडकने दो या चित्रपटामध्ये काम केले होते. पण, झोयाच्या दिग्दर्शनात काम करण्याची आलियाची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, दोन्ही कलाकारांच्या कामाचे व्यग्र वेळापत्रक पाहता या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होणार आहे. तुर्तास रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असून तो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर आलिया भट्ट ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातून पुन्हा एकदा वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:48 pm

Web Title: ranveer singh alia bhatt to come together for the first time in zoya akhtars next
Next Stories
1 ‘बॉलिवूड कोणत्याही कलाकारासाठी अंतिम ध्येय नसते’
2 अश्विनी एकबोटे यांच्या ‘एक्झिट’मुळे शिल्पा नवलकरची ‘एण्ट्री’
3 सलमान-अहिलची ‘सॉलिड टीम’..
Just Now!
X