21 February 2019

News Flash

‘बीच वेडिंग’साठी रणवीर- दीपिका सज्ज?

बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग आणि 'मस्तानी' दीपिका पदुकोण ही अनेक चाहत्यांची आवडती जोडी आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग आणि ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण ही अनेक चाहत्यांची आवडती जोडी आहे. केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही या दोघांची जादू आपल्याला लोकांवर पाहायला मिळते. हे दोघंही सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पण, याव्यतिरीक्तही एका कारणामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक ठिकाणी होत आहे ते कारण म्हणजे या दोघांचं लग्न.

Review वाचा : स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी सनईचौघड्यांचे सूर घुमले. गेल्यावर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न झाल्यानंतर सोनम कपूर आणि दीपिका पदुकोणही त्यांच्या प्रियकरांशी यावर्षात लग्न करण्यासाठी सज्ज असल्याच्या चर्चांना उधाण आले. काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार सोनम प्रियकर आनंद अहुजा याच्यासह लंडन येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दीपिका आणि रणवीर बीच वेडिंग करण्याच्या विचारात असल्याचे कळते.

वाचा : महिलांशी गैरवर्तणूक करणारा कलाकार अडचणीत

‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘होय, रणवीर – दीपिका यावर्षी लग्न करणार असून हे डेस्टिनेशन वेडिंग असेल. त्या दोघांनाही समुद्राजवळची ठिकाण खूप आवडतात त्यामुळे ते बीच वेडिंग करू शकतात. हा एक खासगी समारंभ असेल. यात त्यांचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहिल.

First Published on February 9, 2018 10:23 am

Web Title: ranveer singh and deepika padukone all set for an exotic beach wedding this year