सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा इटलीत २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या लग्न समारंभाला दोघांच्याही कुटुंबातले मोजकेत तीस जण उपस्थित असणार अशी माहिती आहे. दीप- वीरने आपल्या लग्नाबाबत पुरेपूर गोपनियता बाळगली असून हा सोहळा अत्यंत खासगी व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठीच त्यांच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना मोबाईलसुद्धा नेण्यास बंदी आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नसोहळ्याला मोबाईल आणू नये, अशी आग्रहाची विनंती दीपिका आणि रणवीरने पाहुण्यांना केली आहे. लग्नविधीचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, अशी त्या दोघांचीही इच्छा आहे. अनुष्का- विराटच्या लग्नातही उपस्थित असलेल्यांनी लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. अलीकडे सोनमच्या लग्नातही हेच झाल्याचं पाहायला मिळालं. यातूनच धडा घेत रणवीर- दीपिकाने पाहुण्यांना मोबाईल न आणण्याची विनंती केली आहे.

Happy Birthday Saif Ali Khan : ‘या’ अटीवर करिनाने सैफशी बांधली लग्नगाठ

२० नोव्हेंबर रोजी इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्यातील हे सुरेख क्षण अविस्मरणीय व्हावे आणि त्याचे खासगीपण जपले जावे, हा दोघांचाही प्रयत्न आहे.