24 September 2020

News Flash

Photos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्न समारंभाचे फोटो पोस्ट केले आहेत.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

बॉलिवूडची नवविवाहित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसमारंभाचे फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या आठवड्यात १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडला. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य परिसरातील एका व्हिलामध्ये राजेशाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला.  रणवीर- दीपिकाच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. आता मात्र दोघांनीही सोशल मीडियावर मेहंदी, लग्नाचे विधी आणि लग्नानंतरचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

इटलीत १४ नोव्हेंबर रोजी पारंपरिक सिंधी पद्धतीने तर १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने दीप- वीरचा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाच्या फोटोंसाठी चाहत्यांनी फार प्रतीक्षा केली होती. कारण १५ तारखेला संध्याकाळी या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर दोघांनीही बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या  फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह सहज पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे रणवीरने दीपिकाच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत तर दीपिकाने रणवीरच्या मेहंदीचे. रणवीर आणि दीपिका आज सकाळीच मुंबईहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. बंगळुरुमध्ये दीप-वीरने मित्रपरिवारासाठी स्वागतसमारंभाचं आयोजन केलं आहे. या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे.

दीपिका दक्षिण भारतीय असल्याने तिचे बरेच नातेवाईक बंगळुरूमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास रिसेप्शन देण्यात येत आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बॉलिवूडमधले बरेच कलाकार उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 4:30 pm

Web Title: ranveer singh and deepika padukone shares mehendi ceremony pictures on social media
Next Stories
1 वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा ‘पियानो फॉर सेल’
2 ‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन
3 ‘राष्ट्रीय पुरस्कार ही सर्वात मोठी जबाबदारी’
Just Now!
X