News Flash

#RanveerDeepikaWedding : तारीख ठरली अन् मीम्सची सुपारी फुटली

लग्नात रणवीर कोणते कपडे परिधान करणार यावरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

रविवारी संध्याकाळच्या सुमारास अभिनेत्री दीपिका पदुकोणने ट्विटरवर तिच्या लग्नाची घोषणा केली. त्यापाठोपाठ अभिनेता रणवीर सिंगनेही लग्नाबाबत ट्विट केलं. रणवीर- दीपिकाने लग्नाची तारीख जाहीर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. यानंतर ट्विटरवर #RanveerSingh, #DeepikaPadukone, #DeepVeer हे हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होऊ लागले. या वर्षाच्या सुरुवातीपासून रणवीर- दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर लग्नाची तारीख जाहीर केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांसोबतच सोशल मीडियावर मीम्सनाही उधाण आलं आहे. लग्नात रणवीर कोणते कपडे घालणार, लग्नाची बातमी ऐकून रणबीर कपूरची काय प्रतिक्रिया असणार असे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

रणवीर सिंग त्याच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखला जातो. त्यामुळे लग्नात तो कोणते कपडे परिधान करणार यावरून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली. इतकंच नव्हे तर या दीपिका आणि रणवीरने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात अनेकदा एकत्र काम केल्याने लग्नात पंडित म्हणून भन्साळीच पाहायला मिळतील असाही विनोद व्हायरल होत आहे.

पाहा सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट- 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2018 6:04 pm

Web Title: ranveer singh and deepika padukone wedding announcement triggers meme fest online
Next Stories
1 5 दिवसांच्या सेलमुळे मालामाल झाले फ्लिपकार्ट, अॅमेझॉन ; कमावले ‘इतके’ कोटी रुपये
2 Hero ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
3 Video : सापाला हाताळणाऱ्या धाडसी चिमुकल्याचा व्हिडियो पाहिलात?
Just Now!
X