27 February 2021

News Flash

साराच्या पोस्टवर रणवीर सिंगची भन्नाट कमेंट

त्याची कमेंट वाचता कोणाचाही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल

दिग्दर्शक इम्तिआज अलीचा आगामी चित्रपट ‘लव्ह आज कल 2’ चे चित्रीकरण नुकताच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत. ‘लव्ह आज कल 2’ चित्रपटाचे चित्रीकरण संपताच साराने तिचा आणि कार्तिकचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर अभिनेता रणवीर सिंगने कमेंट केली आहे. त्याची कमेंट पाहता कोणाचाही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि कार्तिक आर्यनचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत साराने ‘लव्ह आज कल 2’चे दिग्दर्शक इम्तिआज अली आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. साराची ही पोस्ट पाहताच रणवीरने त्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘सो क्यूट! विसरु नकोस तुला पहिले कोणी भेटवलं’ असे रणवीरने कमेंटमध्ये लिहिले आहे.

साराच्या याच पोस्टवर कार्तिक आर्यनने देखील कमेंट केली आहे. ‘तू माझ्यासाठी लिहिलेले कॅप्शन मी किती वेळा वाचले तुला नाही माहित’ असे कार्तिकने कमेंटमध्ये लिहिले आहे.

इम्तिआज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात सारा आणि कार्तिकसह अभिनेता रणदीप हु़ड्डासुद्धा दिसणार आहे. नुकताच हिमाचलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. हा चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव आज कल’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 4:24 pm

Web Title: ranveer singh and kartik arayan comment on sara ali khan post avb 95
Next Stories
1 विकी कौशलच्या रिलेशनशिप स्टेटसवर राधिका आपटेचा खुलासा
2 हिमेश रेशमियाच्या कारचा अपघात, चालकाची प्रकृती चिंताजनक
3 मृणाल ठाकूर सांगतेय हृतिकसोबत काम करण्याचा अनुभव
Just Now!
X